Bigg Boss 13: अमिषा पटेलच्या आधी या अभिनेत्रीला मिळाली होती घराची मालकीण बनण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 19:24 IST2019-09-30T19:23:59+5:302019-09-30T19:24:27+5:30
बिग बॉसच्या तेराव्या सीझनमध्ये अमिषा पटेल मालकीणीच्या भूमिकेत पहायला मिळत आहे. तिच्या आधी बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला संधी देणार असल्याचं समजतं आहे.

Bigg Boss 13: अमिषा पटेलच्या आधी या अभिनेत्रीला मिळाली होती घराची मालकीण बनण्याची संधी
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसचा तेरावा सीझन नुकताच दाखल झाला आहे. या शोच्या प्रीमियरवेळी सलमान खाननेअमिषा पटेललाबिग बॉसच्या घराची मालकीण म्हणून ओळख करून दिली. सलमाननं सांगितलं की, अमिषा घरातील स्पर्धकांना टास्क देँणार आहे. मात्र आता आलेल्या मी़डिया रिपोर्टनुसार अमिषा पटेलच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्याचा विचार होता.
स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, कलर्स वाहिनीने आधी बिग बॉस १३च्या घराची मालकीण म्हणून अमिषा पटेल ऐवजी मल्लिका शेरावतला घेणार होते. अमिषाच्या आधी मल्लिकाच्या नावाची खूप चर्चा आहे.
सूत्रांनी स्पॉटबॉयला सांगितलं की, कलर्स वाहिनीला बॉलिवूडची अशी अभिनेत्री घ्यायची होती जी बोल्डसोबत चांगली डान्सरदेखील असेल. जी शोमध्ये तिच्या डान्सिंग मुव्ह्जसोबत अदाने सर्वांना घायाळ करेल. या घराच्या मालकीणीसाठी मल्लिका शेरावतला विचारले देखील होते. मात्र मल्लिका शेरावतने या शोचा हिस्सा बनण्यासाठी जास्त मानधन मागितलं. कलर्सच्या टीमने तिच्यासोबत खूप चर्चा केली. पण ती तयार झाली नाही. त्यानंतर मग अमिषा पटेल हिला मालकीण बनवण्यात आलं.
बिग बॉसमध्ये अमिषा पटेलची एन्ट्री झाली आहे. तिने या शोमध्ये धमाकेदार डान्स करत पदार्पण केलं आहे. ती या शोमध्ये घराची मालकीण असून ती कधीही घरात जाऊ शकते.
ती स्पर्धकांची पोलखोल करताना दिसणार आहे. त्यामुळे स्पर्धकांना अमिषापासून सतर्क राहावं लागणार आहे.