Bigg Boss 12: राखी सावंत पुन्हा बोलली...!अनूप जलोटा आणि जसलीनच्या नात्याची अशी उडवली खिल्ली!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 20:46 IST2018-09-20T20:44:37+5:302018-09-20T20:46:09+5:30
‘बिग बॉस ’चे नवे सीझन सुरू असेल आणि राखी सावंत बोलणार नाही, हे शक्यचं नाही. राखी सावंतला बॉलिवूडचा ड्रामा क्वीन म्हणतात ते उगाच नाही.

Bigg Boss 12: राखी सावंत पुन्हा बोलली...!अनूप जलोटा आणि जसलीनच्या नात्याची अशी उडवली खिल्ली!!
‘बिग बॉस ’चे नवे सीझन सुरू असेल आणि राखी सावंत बोलणार नाही, हे शक्यचं नाही. राखी सावंतला बॉलिवूडचा ड्रामा क्वीन म्हणतात ते उगाच नाही. पब्लिसिटी मिळवून देणारे मुद्दे राखी अगदी अचूक हेरते आणि त्यावर बोलत सुटते. ‘बिग बॉस’च्या १२ व्या पर्वाने तिला अशीचं संधी दिलीय. होय, ‘बिग बॉस’च्या घरातील सध्या सर्वाधिक चर्चित स्पर्धकावर तिने निशाणा साधलाय. हा स्पर्धक म्हणजे, भजनसम्राट अनूप जलोटा. होय, अनूप जलोटांनी स्वत:पेक्षा ३५ वर्षांनी लहान जसलीन मथारू हिच्यासोबत ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतलीय. जसलीन व मी आम्ही गत तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत, अशी जाहीर कबुली त्यांनी दिलीय. सध्या अनूप जलोटा यांच्या या रिलेशनशिपची जोरदार खिल्ली उडवली जातेय. सोशल मीडियावर त्यांच्या नात्यावर अनेक जोक्स आणि मीम्स व्हायरल होत आहेत. राखीने हीच संधी साधली आणि अनूप जलोटांना लक्ष्य केले. अनूप जलोटांची खिल्ली उडवणारा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हसू रोखू शकणार नाही.
OMG! Watch This
— Telly Spice (@TellySpice) September 20, 2018
Rakhi sawant on Anup Jalota and Jasleen😂🤗 pic.twitter.com/dHUpu3mBNV
‘अनूपजी अगर सही में ये आपकी गर्लफ्रेन्ड है, तो ठाकूर तो गयो...यू नो व्हाय... जलोटा साहब अब अपना लोटा बचा के रखिये, क्योंकी आपकी गर्लफ्रेन्ड तो गयी...’, असे काय काय राखीने म्हटले आहे. पुढे तिने अनूप जलोटा यांचेच अतिशय गाजलेले ‘ऐसी लागी लगन’ हे भजन गायले आहे. पण यात मीराच्या जागी जसलीनचे नाव घेतले आहे. अनूपजी आता तुमचे वय झाले, हेही तिने सांगितले आहे.
‘बिग बॉस’च्या पहिल्या सीझनची स्पर्र्धक राहिलेली राखी सावंत हिने तिच्या करिअरची सुरुवात ‘अग्निचक्कर’ या चित्रपटातून केली. मात्र राखी तिच्या फिल्मी करिअरपेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत राहिली आहे.