Bigg Boss 11 : जुबेर खानने म्हटले, ‘सलमान खान नपुंसक असल्यानेच त्याचे लग्न होत नाही’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 19:15 IST2017-10-17T13:45:49+5:302017-10-17T19:15:49+5:30

बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर जुबेर खान सलमान खानवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. केवळ हल्लाबोलच ...

Bigg Boss 11: Zubair Khan said, "Salman Khan does not get married because he is impotent"! | Bigg Boss 11 : जुबेर खानने म्हटले, ‘सलमान खान नपुंसक असल्यानेच त्याचे लग्न होत नाही’!

Bigg Boss 11 : जुबेर खानने म्हटले, ‘सलमान खान नपुंसक असल्यानेच त्याचे लग्न होत नाही’!

ग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर जुबेर खान सलमान खानवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. केवळ हल्लाबोलच नव्हे तर आता तो सलमानची सर्व प्रकरणे पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी पीआयएल दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. दरम्यान, जुबेरने सलमानवर आरोपांचा सिलसिला कायम ठेवला असून, त्याला चक्क नपुंसक असे संबोधले आहे. होय, नवभारत टाइम्सच्या पोर्टल न्यूजवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जुबेर खानने म्हटले की, ‘सलमान खान नपुंसक असल्यानेच त्याचे लग्न होत नाही.’  

पुढे बोलताना जुबेरने पुन्हा एकदा सलमानचे कुख्यात डॉन दाउद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचा पुनरुच्चार केला आहे. जेव्हा जुबेर बिग बॉसच्या घराबाहेर पडला होता तेव्हाच त्याने सलमानविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. ज्यानुसार सलमानने जुबेरला नॅशनल टीव्हीवर जिवे मारण्याची धमकी दिली. जुबेरच्या मते, आतापर्यंत दाउदने त्याला ४० वेळा कॉल केले असून, सलमानविरोधातील गुन्हा मागे घेण्यास सांगितले आहे. या कॉल्सचे सर्व डिटेल्स पोलिसांनाही दिल्याचा जुबेरने दावा केला आहे. 



मात्र, पोलीस या प्रकरणाचा कशा पद्धतीने तपास करीत आहेत, शिवाय सलमानविरोधात त्यांनी आतापर्यंत काय कारवाई केली याबाबतचे मात्र जुबेरकडे कुठलेही उत्तर नाही. मात्र जुबेर खानचा सलमानप्रतीचा राग दिवसेंदिवस वाढतच असून, तो त्याच्यावर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. जुबेरने तर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून त्या सर्वांना गोळा करण्याचे काम सुरू केले, जे सलमानमुळे दुखावले गेले. 

जुबेरने म्हटले की, माझ्याकडे काहीही काम नाही. त्यामुळे मी सलमानचा तोपर्यंत पिच्छा पुरविणार जोपर्यंत तो उद्ध्वस्त होत नाही. परंतु या प्रकरणात मजेशीर बाब म्हणजे सलमानकडून अद्यापपर्यंत कुठलीही प्रतिक्रिया समोर आली नाही. त्यामुळे जुबेर-सलमान प्रकरण कुठपर्यंत जाणार हे बघणे मजेशीर ठरेल. खरं तर सलमानला असे प्रकरण काही नवीन नाही. गेल्या भागात स्वामी ओमने देखील सलमानबद्दल असेच काहीसे आरोप केले होते. परंतु त्यात काहीही समोर आले नाही. 

Web Title: Bigg Boss 11: Zubair Khan said, "Salman Khan does not get married because he is impotent"!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.