Bigg Boss 11:शिल्पा शिंदेने बिग बॉसच्या निर्मात्यांकडे प्रत्येक भागाचे मागितले चार लाख रूपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 12:47 IST2017-09-15T07:17:08+5:302017-09-15T12:47:08+5:30
छोट्या पडद्यावर लवकरच बिग बॉस-11 सुरु होणार आहे. बिग बॉसच्या अकराव्या सीझनबाबत रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. बिग बॉसच्या ...
.jpg)
Bigg Boss 11:शिल्पा शिंदेने बिग बॉसच्या निर्मात्यांकडे प्रत्येक भागाचे मागितले चार लाख रूपये
छ ट्या पडद्यावर लवकरच बिग बॉस-11 सुरु होणार आहे. बिग बॉसच्या अकराव्या सीझनबाबत रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक, त्यांच्यातील वाद, चढाओढ आणि बिग बॉसच्या घरातील विविध टास्क यामुळे हा रिअॅलिटी शो कायमच चर्चेत असतो. आता बिग बॉसचा नवा सीझन रसिकांच्या भेटीला येत असताना बिग बॉसच्या घरात कोण कोण दाखल होणार याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. 'भाभी जी घर पर है' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अंगूरी भाभी म्हणजेच अभिनेत्री शिल्पा शिंदे बिग बॉसच्या अकराव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून दाखल होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शिल्पा बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून दाखल होणार असल्याचे बोललं जात होतं. गेल्या काही दिवसांत शिल्पा शिंदे विविध कारणांमुळे चर्चेत राहिली होती. भाभीजी घर पर है या मालिकेच्या निर्मात्यावर शिल्पा शिंदेने धक्कादायक आरोप केले होते. निर्मात्याने आपले शोषण केल्याचा आरोप शिल्पाने केला होता. यानंतर शिल्पाने लगेचच या शोमधून एक्झिट घेतली होती. सुंदर, हुशार आणि रागीट स्वभाव अशी शिल्पा शिंदेची ओळख बनली आहे. तिच्या याच गुणांचा वापर करुन बिग बॉसच्या अकराव्या सीझनला अधिक टीआरपी मिळवण्याचा शोच्या निर्मात्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यासाठी शिल्पा शिंदेकडे विचारणा झाली आहे. बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल होण्यासाठी शिल्पा शिंदे हिला प्रत्येक भागासाठी चार लाख रुपये मानधन मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता खुद्द शिल्पा शिंदे हिनेच याबाबत खुलासा केला आहे. गेल्या सीझनप्रमाणे यंदाही बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी आपल्याकडे विचारणा झाल्याचे शिल्पा शिंदे हिने सांगितले आहे. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी शिल्पानं होकारही कळवला होता. मात्र चर्चा सुरु असतानाच अचानक माशी शिंकली आणि शिल्पा बिग बॉसच्या घरात सहभागी होणार नसल्याचे आता समोर आले आहे. शिल्पाने केलेली गलेलठ्ठ मानधनाची मागणी हे या मागचं कारण आहे. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी सुरुवातीला 20 लाख रुपये मिळावे आणि त्यानंतर प्रत्येक भागाचे चार लाख देण्यात यावेत अशी मागणी शिल्पाने बिग बॉसच्या निर्मात्यांकडे केली होती.या मागणीमुळेच शिल्पाचा शोमधून पत्ता कट झाल्याचे बोललं जात आहे.
Also Read:बिग बॉसच्या ११व्या पर्वामध्ये झळकणार हे सेलिब्रिटी
Also Read:बिग बॉसच्या ११व्या पर्वामध्ये झळकणार हे सेलिब्रिटी