Bigg Boss 11:सपना चौधरीच्या पुढे फिका पडला हिना खानचा डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 15:45 IST2017-10-23T09:59:44+5:302017-10-23T15:45:08+5:30

बिग बॉसमध्ये  हरियाणवी डान्सर सपना चौधरीने  एंट्री करताच स्पर्धकांसह रसिकांनाही थिरकायला भाग पाडले. पहिल्याच दिवशी सपना ने सलमानलाही आपल्या ...

Bigg Boss 11: Hina Khan's Dance Ahead of Sapna Chaudhary | Bigg Boss 11:सपना चौधरीच्या पुढे फिका पडला हिना खानचा डान्स

Bigg Boss 11:सपना चौधरीच्या पुढे फिका पडला हिना खानचा डान्स

ग बॉसमध्ये  हरियाणवी डान्सर सपना चौधरीने  एंट्री करताच स्पर्धकांसह रसिकांनाही थिरकायला भाग पाडले. पहिल्याच दिवशी सपनाने सलमानलाही आपल्या तालावर थिरकायला भाग पाडले.सपना चौधरीचे ठुमके पाहताच सलमानही स्वतःला रोखू शकला नाही.म्हणूनच की काय सपनासह थिरकताना सलमान जोमात ठुमके लावताना दिसला.त्या दिवसापासूनच सपना चौधरीची जादू घरात पाहायला मिळत आहे. सपना बिग बॉसकडून मिळणारे सगळे टास्क यशस्वीरित्या पूर्ण करताना दिसते.याचीच प्रचिती नुकतेच बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा आली. बिग बॉसच्या घरात दिवाळी सेलिब्रेशनच्या निमित्ताने नव्याने सुरू होणा-या मालिकेतील कलाकारांनी घरात एंट्री घेत स्पर्धकांसह वेगवेगळ्या गोष्टी करत रसिकांचे तुफान मनोंरजन केल्याचे पाहायला मिळाले.

जेव्हा बिग बॉसने हिना खानला सपना चौधरीसह एका गाण्यावर डान्स करण्याचा टास्क दिला. तेव्हा दोघांनीही जोमात डान्स करायला सुरूवात केली.डान्स करण्यात सपना चौधरीचा कोणीही हात पकडु शकत नाही याचीच प्रचिती हा डान्स पाहताना आली.आपल्या अभिनयाने आणि सौदर्यांने रसिकांची लाडकी बनलेली अक्षरा म्हणजेच  हिना खानची सपना पुढे जादू कमी झाल्याचे पाहायला मिळाले.यावेळी सपना चौधरीने तिचा सुपरहिट डान्स ''तेरी अखियों का ये काजल'' गाण्यावर ठेका धरत सा-यांनाच थिरकायला भाग पाडले.सगळे स्पर्धकही सपनाच्या डान्सवर फिदा झाल्याचे पाहायला मिळाले.त्यामुळेच तेही हिना आणि सपनासह स्वतःला डान्स करण्यासाठी रोखु शकले नाहीत.सपना आणि हिनासह फुल ऑन डान्स करत सा-यांनीच एकच धम्माल उडवून दिल्याचे पाहायला मिळाले. बिग बॉसकडून मिळालेल्या  टास्कमध्ये हिना आणि सपना दोघांचा बेस्ट परफॉर्मन्स ठरला. 

हरियाणामध्ये सपना प्रचंड प्रसिद्ध असली तरी ती आजही स्वतःला एक सामान्य मुलगीच समजते. सपना १२ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले.घरची परिस्थिती बेताची असल्याने एवढ्या लहान वयात तिला घरची जबाबदारी उचलावी लागली. त्यामुळेच ती गायन आणि नृत्याकडे वळली. या तिच्या डान्समुळे सपनाने तिच्या घरातल्यांना सगळ्या सुखसोयी दिल्या.तिच्या बहिणीचे लग्न करून दिले.सपनाच्या सॉलिड बॉडी या पहिल्याच गाण्याने युट्युबला धुमाकूळ घातला होता.तिच्या पहिल्याच गाण्यामुळे ती फेमस झाली.आज तर तिची एक झलक पाहाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. अनेक वेळा तर तिच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जदेखील करावा लागतो. कोणताही स्टेज शो म्हटला की,एक संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. पण सपनाच्या कार्यक्रमात ती एकटीच अनेक तास लोकांचे मनोरंजन करते आणि विशेष म्हणजे ती कधीही पंजाबी ड्रेसमध्येच परफॉर्म करते. सपनाला घरात ज्या काही गोष्टी घडत आहेत.त्या गोष्टी आवडत नसल्यातरीही समोर येणा-या प्रत्येक गोष्टीला न घाबरता सामोरे जाण्याचा प्रयत्न करेन असे वारंवार ती घरात ती सांगत असते.त्यामुळेच आता फक्त हरियाणामध्येच प्रसिद्ध असलेली सपना आता रसिकांच्या मनंही जिंकण्यात यशस्वी ठरली आहे.
           

Web Title: Bigg Boss 11: Hina Khan's Dance Ahead of Sapna Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.