​बिग बॉस 11 फेम अर्शी खान सांगतेय त्या रात्री घडले होते असे काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 13:59 IST2017-10-31T08:29:58+5:302017-10-31T13:59:58+5:30

बिग बॉसमध्ये सध्या अर्शी खान आपल्याला स्पर्धकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. सपना चौधरी हिने अर्शी खान हिच्याबद्दलचे अनेक धक्कादायक ...

Bigg Boss 11 fame Arshi Khan tells that something happened that night ... | ​बिग बॉस 11 फेम अर्शी खान सांगतेय त्या रात्री घडले होते असे काही...

​बिग बॉस 11 फेम अर्शी खान सांगतेय त्या रात्री घडले होते असे काही...

ग बॉसमध्ये सध्या अर्शी खान आपल्याला स्पर्धकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. सपना चौधरी हिने अर्शी खान हिच्याबद्दलचे अनेक धक्कादायक खुलासे बिग बॉसच्या घरात केल्याने घरात एकच खळबळ उडाली होती. जेव्हा अर्शी आणि सपना हिच्यात वाद झाला. तेव्हा सपनाने तिला म्हटले की, ‘मला माहिती आहे की, तू गोवा आणि पुण्यात काय केले?’ सपनाचे हे बोल ऐकताच अर्शीच्या डोळ्यात अश्रू आले होते. पण या घटनेनंतर अर्शी खान खरेच कोणत्या सेक्स रॅकेट मध्ये सहभागी होती का याची जोरदार चर्चा रंगली आहे. अर्शी खानला पुण्यातील एका हॉटेलमधून पकडण्यात आले होते. पण माझी काहीही चूक नसताना या प्रकरणात मला गोवण्यात आले असल्याचे अर्शीने म्हटले होते. अर्शीच्या बाबतीत त्या रात्री काय काय घडले होते. याविषयी अर्शीनेच एका मुलाखतीत सांगितले आहे. तिने म्हटले होते की, मी माझी कामे संपवून पुण्यातील सेंट्रल मॉलमध्ये शॉपिंग करत होते. त्यानंतर मी हॉटेल अरोरा टॉवरमध्ये गेले. तिथे असताना रात्री साडे बाराच्या सुमारास मला विपुल नावाच्या माणसाचा फोन आला होता. त्याने मला सांगितले की, तो माझा फॅन असून तो याच हॉटेलमधील बारमध्ये आहे. तिथे येऊन त्याने मला भेटण्याची विनंती केली होती. त्यावर मी रात्री कोणाला भेटत नाही असे मी त्याला सांगितले. त्यावर त्याने मला सॉरी बोलून फोन ठेवून दिला. मी माझ्या रूमवर गेले आणि झोपले. तर रात्री पुणे क्राईम ब्रांचची लोक माझ्या रूममध्ये घुसले आणि मला म्हणाले की, तुम्ही पाकिस्तानी असल्याचे आम्हाला कळले आहे. तुमचे आईडी कार्ड आम्हाला दाखवा आणि तेवढ्यात त्या विपुल नावाच्या व्यक्तिला ते मारायला लागले. त्यावर काय झाले असे मी विचारले असता आम्ही रेड मारली असून तुला त्यात पकडले आहे असे त्यांनी मला सांगितले. मी काहीच केलेले नाही असे मी त्यांना सतत सांगून देखील त्यांनी माझे ऐकले नाही. मला त्या लोकांनी खूप त्रास दिला. माझ्याकडे त्यांनी १५ लाखांची मागणी केली होती. मी १५ लाख दिले तर प्रकरण इथेच संपवून टाकू असे त्यांनी मला सांगितले होते. 

Also Read : अर्शी खानला एक्सपोझ करणे सपना अन् प्रियांकला पडले महागात; या व्यक्तीने केला गुन्हा दाखल!

Web Title: Bigg Boss 11 fame Arshi Khan tells that something happened that night ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.