Bigg Boss 11 : अर्शी खान अन् हितेन तेजवानीमधील कनेक्शन आले समोर; जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 21:45 IST2017-12-06T16:15:10+5:302017-12-06T21:45:10+5:30

बिग बॉस सीजन ११ च्या सुरुवातीपासूनच अर्शी खान ही हितेन तेजवानी याच्यावर फिदा असल्याचे तिने दाखवून दिले आहे. घरात ...

Bigg Boss 11: A connection between Arshi Khan and Hiten Tejwani came in front; Read in detail to know! | Bigg Boss 11 : अर्शी खान अन् हितेन तेजवानीमधील कनेक्शन आले समोर; जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर!

Bigg Boss 11 : अर्शी खान अन् हितेन तेजवानीमधील कनेक्शन आले समोर; जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर!

ग बॉस सीजन ११ च्या सुरुवातीपासूनच अर्शी खान ही हितेन तेजवानी याच्यावर फिदा असल्याचे तिने दाखवून दिले आहे. घरात ती हितेनला खूश करण्याची एकही संधी सोडत नसून, ती त्याच्या नेहमीच मागावर असते. तर दुसरीकडे हितेन अर्शीच्या या स्वभावामुळे वैतागला असून, तो तिला सातत्याने टाळण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र अशातही अर्शी हितेनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. एवढेच काय तर अर्शी हितेनला पती म्हणून बोलावितानाही बघावयास मिळाली. मात्र, अशातही हितेन अर्शीपासून दूर राहणे पसंत करतो. परंतु शोमधीलच एका अनसीन व्हिडीओमध्ये दोघांमध्ये एक कनेक्शन असल्याचे बघावयास मिळाले. 

होय, या व्हिडीओमध्ये अर्शी म्हणते की, हितेनला बघताक्षणीच मला त्याच्या परिस्थितीचा अंदाज येतो. अर्शीच्या याच वक्तव्यावर विकास गुप्ता चेष्टामस्करीत दोघांमधील कनेक्शनवर बोलताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये अर्शी तिच्या बेडवर झोपण्यासाठी जात असते. तेव्हा समोरच्या बेडवर बसलेला हितेन विकासला म्हणतो की, अर्शी झोपायला जात आहे. तिच्या चेहºयावर गुलाबजल लावून ये. तेव्हा विकास अर्शीला विचारतो की, ‘तू झोपायला जात आहेस काय?’ त्यावर अर्शी म्हणते, होय मी दहा मिनिटांसाठी झोपायला जात आहे. त्यामुळे मला कोणी उठविण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा अपमान सहन करावा लागेल. एवढ्यात विकास अर्शीच्या चेहºयावर स्प्रे मारतो. त्याचवेळी हितेन म्हणतो की, जर माझ्या चेहºयावर स्प्रे मारला असता, तर मी तुझा अपमान केला असता. 

हिंतेनच्या या वाक्यानंतर अर्शी त्याच्याकडे बघून म्हणते की, ‘हितेन काय झालं तब्येत तर बरी आहे ना? हितेन मान हलवून हो, असे म्हणतो. पुढे विकास या दोघांमधील ट्युनिंग बघून म्हणतो की, ‘यार तू हितेनला बघता क्षणीच त्याची तब्येत खराब असल्याचे ओळखले. याचा अर्थ तुमच्यात काहीतरी कनेक्शन आहे. कारण कोणी काहीही न सांगता दुसºयाने त्याच्याबद्दल ओळखणे याचा अर्थ काय समजायला हवा? विकास बोलत असतानाच हितेन म्हणतो की, मीच तिला याबाबत सांगितले होते. त्यावर अर्शी म्हणते, नाही हितेनने मला याविषयी काहीही सांगितले नाही. त्यानंतर विकास आणि अर्शी ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचे गाणे गुणगुणतात. 

Web Title: Bigg Boss 11: A connection between Arshi Khan and Hiten Tejwani came in front; Read in detail to know!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.