Bigg Boss 11 : अर्शी खानला आवडतात ‘असे’ पुरुष; हितेन तेजवानीला म्हटले डरपोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 17:56 IST2018-01-02T12:26:22+5:302018-01-02T17:56:22+5:30

बिग बॉसच्या ११ सीजनची स्पर्धक असलेली अर्शी खान बिग बॉसच्या घरात जेवढी चर्चेत होती, तेवढीच घराबाहेरही चर्चेत आहे. जेव्हा ...

Bigg Boss 11: Arshi Khan likes 'Men'; Hiten Tejavani said timid! | Bigg Boss 11 : अर्शी खानला आवडतात ‘असे’ पुरुष; हितेन तेजवानीला म्हटले डरपोक!

Bigg Boss 11 : अर्शी खानला आवडतात ‘असे’ पुरुष; हितेन तेजवानीला म्हटले डरपोक!

ग बॉसच्या ११ सीजनची स्पर्धक असलेली अर्शी खान बिग बॉसच्या घरात जेवढी चर्चेत होती, तेवढीच घराबाहेरही चर्चेत आहे. जेव्हा अर्शी शोमध्ये होती, तेव्हा तिने आपल्या जलव्याने प्रेक्षकांना जणूकाही भुरळ घातली होती. शोमध्ये हितेन तेजवानीसोबतच्या फ्लर्टमुळे चांगलीच चर्चेत राहायची. मात्र शोबाहेर आल्यानंतर तिला नेमके कोणते पुरुष आवडतात, याविषयीचा तिने खुलासा केला. अर्शीने एका मुलाखतीत हितेनला या शोमधील एकमेव मर्द असल्याचे म्हटले, त्याचबरोबर तिने त्याला भित्रा (डरपोक) असेही संबोधले. 

बिग बॉसच्या शोबाहेर पडल्यानंतर अर्शी बिग बज टॉक शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने शोमध्ये असलेल्या सर्व पुरुष स्पर्धकांबद्दल आपले मत मांडले. यावेळी शोच्या होस्टने जेव्हा अर्शीला, ‘तुला कशाप्रकारचे पुरुष आवडतात?’ असे विचारले तेव्हा अर्शीने म्हटले की, ‘मला टकले पुरुष आवडतात.’ पुढे हसत-हसत अर्शीने म्हटले की, कदाचित याच कारणामुळे बिग बॉसने शोमधील सर्व पुरुषांना टकले होण्यास भाग पाडले असावे. दरम्यान, अर्शी या शोमध्येदेखील आपले जलवे दाखविताना बघावयास मिळाली. यावेळी जेव्हा अर्शीला शोमधील सर्वात दमदार पुरुषाबद्दल विचारले, तेव्हा तिने हितेन तेजवानीचे नाव घेतले. 



तिने म्हटले की, मी त्याच्यावर फिदा होती. तो या वयातही खूप यंग दिसतो. त्यानंतर शोचा होस्ट साहिलने म्हटले की, तुला हितेनबरोबर एखादा चित्रपट नक्की करायला हवा. मात्र अर्शीने ही आॅफर स्पष्ट शब्दात नाकारली. तिने म्हटले की, ‘तो खूप भित्रा आहे. मी जेव्हा त्याला स्पर्श करीत होती, तेव्हा तो पळून गेला. पुढे बोलताना अर्शीने म्हटले की, मला विवाहित पुरुष आवडतात. यावेळी अर्शीने आकाश ददलानी याला मूर्ख आणि बावळट असे म्हटले. अर्शीला जेव्हा प्रियांकविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, तो स्वत:ला खूप एक्सपर्ट आणि खूप मोठा सुपरस्टार समजतो. मात्र त्यात तसे काहीच नाही. तर विकास गुप्ताचे गुनगाण करताना तो खूप चांगला असल्याचे म्हटले. 

Web Title: Bigg Boss 11: Arshi Khan likes 'Men'; Hiten Tejavani said timid!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.