Bigg Boss 11 : अर्शी खानने घेतला सलमान खानशी पंगा; शिल्पा शिंदेची बाजू घेत असल्याचा केला आरोप!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 17:06 IST2017-12-09T11:34:05+5:302017-12-09T17:06:14+5:30
या वीकेण्डच्या वारमध्ये सलमान खान अन् अर्शीमध्ये चांगलीच जुंपल्याचे बघावयास मिळणार आहे. वाचा सविस्तर!

Bigg Boss 11 : अर्शी खानने घेतला सलमान खानशी पंगा; शिल्पा शिंदेची बाजू घेत असल्याचा केला आरोप!!
ब ग बॉसचा ११वा सीजन हा अतिशय रंजक अशा वळणावर येऊन ठेपला आहे. या आठवड्यात घरातील सदस्यांच्या नातेवाइकांची घरात एंट्री झाली होती. ज्यामध्ये शिल्पा शिंदेची आईदेखील आपल्या लेकीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी शिल्पा शिंदेच्या आईने घरातील सर्व सदस्यांशी आपुलकीने चर्चा केली. तसेच माझ्या मुलीला जर तुम्ही ‘मां’ असे म्हणत असाल तर तिचा आदर करा अशी विनवणीही केली होती. यावेळी शिल्पाच्या आईने अर्शी खान हिचीही भेट घेतली होती. परंतु अर्शीने शिल्पाच्या आईला ‘वाहियात औरत’ असे म्हटले होते. हीच बाब भाईजान सलमान खानला खूप खटकली. त्याने अर्शी खानचा क्लास घेत चांगलेच खडेबोल सुनावले. परंतु अर्शीने सलमानशी पंगा घेताना शिल्पाने माझ्या वडिलांकडे अतिशय घाणेरड्या नजरेने बघितल्याचे म्हटले. या वीकेण्डच्या वारमध्ये या दोन्ही विषयावरून घरात चांगलाच घमासान झाल्याचे बघावयास मिळाले.
सलमान खानने अर्शी खानला म्हटले की, तू ज्यापद्धतीने शिल्पावर आरोप लावला तो पूर्णत: चुकीचा आणि निराधार आहे. तिने तुझ्या वडिलांबद्दल तसे काहीही केले नव्हते. परंतु ज्यापद्धतीने तू शिल्पाच्या आईबरोबर बोलताना शब्दप्रयोग केला तो पूर्णत: चुकीचा आहे. मात्र सलमानची ही बाब अर्शीला चांगलीच खटकली. तिने सलमानसोबतच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तिने जाहीरपणे सलमानवर आरोप लावताना म्हटले की, ‘तू शिल्पा शिंदेची बाजू घेतोस’ अर्शीने म्हटले की, ‘सलमान साहब आप हमेशा शिल्पा की साइड लेते हैं’!
मात्र यावर सलमान विकास गुप्ताला टोमणा मारताना, हीच का तुझी कॅप्टन चॉइस’ असे म्हणतो. दरम्यान, गेल्या काही काळापासून अर्शी शिल्पाबद्दल प्रचंड निगेटिव्ह असल्याचे दिसून येत आहे. ती शिल्पा सातत्याने टोमणे मारत असून, तिच्यासोबत हुज्जत घालण्याची एकही संधी ती सोडताना दिसत नाही. आता या वीकेण्डच्या वारमध्ये सलमान शिल्पाची कशी क्लास घेतो हे बघणे मजेशीर असेल.

}}}} ">.@Beingsalmankhan questions Arshi Khan about her comment to Shilpa Shinde. Tune in to #WeekendKaVaar tomorrow at 9 PM to find out what happens! pic.twitter.com/f9XImm4vh5— COLORS (@ColorsTV) December 8, 2017
.@Beingsalmankhan questions Arshi Khan about her comment to Shilpa Shinde. Tune in to #WeekendKaVaar tomorrow at 9 PM to find out what happens! pic.twitter.com/f9XImm4vh5— COLORS (@ColorsTV) December 8, 2017