Bigg Boss 10: विक्रांतबरोबर लग्न करण्यासाठी मोनालिसाला मिळाले होते चक्क 50 लाख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 15:35 IST2017-09-15T10:05:37+5:302017-09-15T15:35:37+5:30

बिग बॉस सगळ्यांत वादग्रस्त म्हणून लोकप्रिय असलेला रिअॅलिटी शो. पहिल्या सिझनपासून वेगवेगळ्या वादात हा शो अडकत असतो. बिग बॉसच्या ...

Bigg Boss 10: Monilisa got 5 million to get married with Vikrant! | Bigg Boss 10: विक्रांतबरोबर लग्न करण्यासाठी मोनालिसाला मिळाले होते चक्क 50 लाख!

Bigg Boss 10: विक्रांतबरोबर लग्न करण्यासाठी मोनालिसाला मिळाले होते चक्क 50 लाख!

ग बॉस सगळ्यांत वादग्रस्त म्हणून लोकप्रिय असलेला रिअॅलिटी शो. पहिल्या सिझनपासून वेगवेगळ्या वादात हा शो अडकत असतो. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक, त्यांच्यातील वाद, चढाओढ आणि बिग बॉसच्या घरातील विविध टास्क यामुळे हा रिअॅलिटी शो कायमच चर्चेत असतो. मात्र रिअॅलिटी शो समजला जाणारा हा शो कितपत रिअल आहे याबाबतीतही नेहमी प्रश्न उपस्थित केले जातात. बिग बॉसचा 11 वा सिझन लवकरच सुरू होणार आहे. या शोचे प्रोमो सुरू झाल्यापासून या शोच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता पाहायला मिळते आहे. मात्र रिअॅलिटी पाहायला मिळते या हेतुने पाहणा-या रसिकांना मात्र ही गोष्ट ऐकून कमालीचा धक्का बसल्या शिवाय राहणार नाही. होय,गलेलठ्ठ मानधन देऊन सेलिब्रेटींना या शोमध्ये सहभागी केले जाते. हे तर आतापर्यंत सगळ्यांना माहिती आहेच.मात्र आणखी एक गोष्टीचे रहस्य उघड झाले आहे. रिअॅलिटी शोमधील पडद्यामागची मानधनाची रिअॅलिटी पुन्हा एकदा समोर आली आहे. अशाप्रकारे गलेलठ्ठ मानधन देऊन सेलिब्रिटींना घरात आणायचं, नवे वाद निर्माण करायचे आणि शोला टीआरपी मिळवायचे असा आरोप याआधी वारंवार झाला आहे. बिग बॉसच्या दहाव्या सीझनमध्येही भोजपुरी स्टार मोनालिसा हिचं बिग बॉसच्या घरात शुभमंगल पार पडलं होतं.बॉयफ्रेंड विक्रांतसह बिग बॉसच्या घरातच मोनालिसाचा विवाह सोहळा पार पडला. या घरातील स्पर्धक आणि मोनालिसा-विक्रांतचे कुटुंबीय सहभागी झाले होते. मात्र आता बिग बॉसचे नव्या पर्वाला सुरूवात होण्याआधी मोनालिसाच्या लग्नाची अजब गोष्ट समोर आली आहे. बिग बॉसच्या घरात विक्रांतसह रेशीमगाठीत अडकण्यासाठी मोनालिसाला चक्क 50 लाख रुपये देण्यात आल्याचं समोर आलं आहे.बिग बॉस सिझन 10  शो संपल्यानंतर बिग बॉसच्या घरात विक्रांतसोबत लग्न लावण्यासाठी मोनालिसा आणि विक्रांतला भरपूर पैसा दिला गेल्याचे बोलले जात होते. त्यात करण जोहरनेही तिच्या लग्नावरून वादग्रस्त वक्तव्य करून त्यात भर टाकली होती. याचाच समाचार घेताना मोनालिसाने करण जोहरला सुनावले होते. मोनालिसा म्हणाली  होती की, इतर लोकांप्रमाणे करण सर यांनी देखील म्हटले की, हे लग्न नसून स्टंट आहे. हे ऐकून मला खरोखरच खूप वाईट वाटले.माझ्यासाठी हे लग्न खूपच स्पेशल आहे. मी आणि विक्रांत गेल्या आठ वर्षांपासून एकत्र राहत आहोत. फक्त आम्ही विवाहबंधनात अडकलेलो नव्हतो एवढेच! आम्ही लग्न करण्याचा यापूर्वी विचारही केला होता, मात्र योग आला नव्हता. या लग्नाला आमच्या परिवारातील सर्वांचा पाठिंबा असल्याचेही तिने स्पष्ट केले होते.मोनाने पुढे बोलताना म्हटले की,आम्ही लग्न केले नव्हते तरीदेखील इंडस्ट्रीमधील लोक आम्हाला विवाहित समजायचे.ब-याच वेळा तू विक्रांतची पत्नी आहेस का? असे मला विचारले गेले. त्यावेळी मी त्यांना नकार द्यायची.मात्र त्याचबरोबर आम्ही धूमधडाक्यात लग्न करणार असल्याचेही सांगत असे. अशात जेव्हा आम्हाला बिग बॉसने स्क्रीनवर लग्न करण्याची संधी दिली तेव्हा आम्ही दोघांनीही लगेचच त्यास होकार दिला. आम्ही जगासमोर लग्न केले, त्यामुळे आमच्या लग्नाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचेही मोनलिसाने सांगितले होते. 

Also Read:या दिवशी सुरू होणार बिग बॉस सिझन ११

Web Title: Bigg Boss 10: Monilisa got 5 million to get married with Vikrant!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.