'मुरांबा' मालिकेत मोठा ट्विस्ट, रमाच्या आयुष्याची होणार नव्याने सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:29 IST2025-07-28T17:29:11+5:302025-07-28T17:29:47+5:30

Muramba Serial : 'मुरांबा'मध्ये नवा अध्याय सुरु झालाय. मालिकेत सात वर्षांचा लीप आल्यानंतर रमा आणि अक्षयचं नातंही नव्या वळणावर येऊन पोहोचलं आहे.

Big twist in the serial 'Muramba', Rama's life will start anew | 'मुरांबा' मालिकेत मोठा ट्विस्ट, रमाच्या आयुष्याची होणार नव्याने सुरुवात

'मुरांबा' मालिकेत मोठा ट्विस्ट, रमाच्या आयुष्याची होणार नव्याने सुरुवात

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'मुरांबा'(Muramba Serial)मध्ये नवा अध्याय सुरु झालाय. मालिकेत सात वर्षांचा लीप आल्यानंतर रमा आणि अक्षयचं नातंही नव्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. सात वर्षांपूर्वी एकमेकांमधल्या गैरसमजांमुळे रमा-अक्षय दुरावले. अक्षयने आपली लेक आरोहीसोबत नव्याने आयुष्याला सुरुवात केली. तर तिकडे रमा पाचगणीमध्ये नवी ओळख बनवू पहातेय.

आतापर्यंत रमाला आपण दोन वेण्यांमध्ये पाहत आलोय. पण लीपनंतर रमाचा नवा लूक समोर आलाय. रमाने आता सगळा भूतकाळ मागे सोडून नवीन आयुष्य जगायचं ठरवलं आहे. भूतकाळाशी असणारी नाळ तोडण्यासाठी तिने आपल्या दोन वेण्या कापल्या आहेत. रमा पाचगणीतल्या सगळ्यात मोठ्या शाळेची ट्रस्टी आहे. आधी पेक्षा जास्त खंबीर आणि इंग्रजी भाषेवर कमालीचं वर्चस्व असणारी एक नवी रमा आता जगासमोर आहे. 

रमा-अक्षय पुन्हा एकत्र येणार का?

रमा जरी भूतकाळ विसरली असली तरी आपल्या मुलीला मात्र ती कधीच विसरली नाही. लेकीपासून दुरावल्यानंतर रमाने गोड खाणं सोडलं आहे. ती सगळ्यांना गोड़ खायला घालते. पण ती स्वतः खात नाही. आपल्या लेकीला तिने बबडू असं नाव दिलं आहे.
मालिकेच्या पुढील भागांमध्ये रमाची आणि तिच्या लेकीची भेट होणार का? रमा-अक्षय पुन्हा एकत्र येणार का? हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. 

Web Title: Big twist in the serial 'Muramba', Rama's life will start anew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.