'# लय आवडतेस तू मला'मध्ये मोठा ट्विस्ट, सरकार आणि सानिकामध्ये सर्वेशमुळे येणार दुरावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:15 IST2025-01-08T14:14:23+5:302025-01-08T14:15:28+5:30

#Lay Aavadtes Tu Mala : '#लय आवडतेस तू मला' मालिकेत सरकार - सानिकाची लव्हस्टोरी सुरू झाली पण ही लव्हस्टोरी सुरु होण्याआधीच सर्वेश नावाचे ग्रहण याला लागणार आहे.

Big twist in '#Lay Aavadtes Tu Mala', will Sarkar and Sanika be separated because of Sarvesh? | '# लय आवडतेस तू मला'मध्ये मोठा ट्विस्ट, सरकार आणि सानिकामध्ये सर्वेशमुळे येणार दुरावा?

'# लय आवडतेस तू मला'मध्ये मोठा ट्विस्ट, सरकार आणि सानिकामध्ये सर्वेशमुळे येणार दुरावा?

'#लय आवडतेस तू मला' मालिकेत सरकार - सानिकाची लव्हस्टोरी सुरू झाली पण ही लव्हस्टोरी सुरु होण्याआधीच सर्वेश नावाचे ग्रहण याला लागणार आहे. कारण आता सर्वेशमुळेच - सरकार सानिकामध्ये दुरावा येणार आहे असं वाटू लागलं आहे. सरकार सानिकाच्या मनात एकमेकांबद्दल हळूहळू प्रेम भावना निर्माण झाल्या आहेत. 

सानिकाला सरकार आवडू लागला आहे, याची पूर्ण कल्पना पंकजा आणि सर्वेशला आहे. आता म्हणूनच सरकार - सानिकामध्ये कायमचा दुरावा यावा यासाठी सर्वेश एक डाव खेळणार आहे. आता सर्वेशची  खेळी त्यावर उलटणार की खरंच त्यात सरकार - सानिका अडकणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. ट्रिप दरम्यान सानिकाला सरकारच्या मनात तिच्याबद्दल प्रेम आहे हे कळत. दोघे ट्रीपवरून परत येतात आणि तेव्हाच पंकजा सानिकाला सांगते की तिचा आणि सर्वेशचा साखरपुडा ठरलाय. सानिका आणि सरकारला धक्का बसतो. हे सगळं ऐकून सरकारला वास्तवची जाणीव होते आणि तो ते स्वीकारायचं ठरवतो तर दुसरीकडे सानिकाला वाटतंय राजाने प्रेम कबूल करावे. सानिका राजाला मिठी मारते.


सानिका राजाला विचारते की तुझ्या फिलिंग सांग ज्यावर राजाने ठामपणे नकार देतो. सानिकाला सत्य स्वीकारता यावं म्हणून सर्वेशने सांगितल्याप्रमाणे राजा आता सर्वेश आणि सानिकाच्या साखरपुड्याची तयारी करण्यास होकार देतो. सरकार प्रेमाची कबुली देईल का? साखरपुडा खरंच पार पडणार का? पुढे काय होणार ? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
 

Web Title: Big twist in '#Lay Aavadtes Tu Mala', will Sarkar and Sanika be separated because of Sarvesh?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.