'कॉन्स्टेबल मंजू'मध्ये मोठा ट्विस्ट, मम्मीसाहेबाचा नवा डाव, मंजू-सत्याच्या आयुष्यात पुढे काय घडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 16:49 IST2024-09-20T16:48:46+5:302024-09-20T16:49:18+5:30
Constable Manju Serial : 'कॉन्स्टेबल मंजू' मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आकर्षक कथानक आणि दमदार कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे या मालिकेला प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळत आहे.

'कॉन्स्टेबल मंजू'मध्ये मोठा ट्विस्ट, मम्मीसाहेबाचा नवा डाव, मंजू-सत्याच्या आयुष्यात पुढे काय घडणार?
सन मराठीवरील 'कॉन्स्टेबल मंजू' (Constable Manju Serial ) मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आकर्षक कथानक आणि दमदार कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे या मालिकेला प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत मोनिका राठी, वैभव कदम आणि विद्या सावळे म्हणजेच ‘मम्मीसाहेब’ ही भूमिका साकारताना दिसत आहेत
मालिकेच्या सुरुवातीपासून आपण पाहिले आहे की मम्मीसाहेब नेहमी मंजूने केलेल्या प्रत्येक गोष्टीचा गैरसमज करतात.आता येणाऱ्या भागात प्रेक्षकांना नवीन वळण पाहायला मिळणार आहेत. प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे मम्मीसाहेब सत्या - मंजूला घराबाहेर काढते पण तात्यासाहेब दोघांना घरी घेऊन जातात.सत्या आणि मंजू तात्यासाहेच्या घरी गेल्यामुळे मम्मीला दोघांना परत घरी आण्यासाठी जाणं भाग पडतं. मम्मीसाहेब त्यात्यासाहेबांसमोर स्वतःला चांगलं दाखवण्यासाठी सत्या - मंजूला परत आणायला जातात.पण तात्या मम्मीला सगळ्यांसमोर माफी मागायला सांगतात. हे ऐकून मम्मीला धक्का बसतो.
आता मम्मी मंजूची माफी मागेल का? सत्या आणि मंजू घरी परत येतील का की तात्यासाहेबांच्या घरात वेगळाच खेळ रंगणार ? हे वळण लवकरच तुम्हाला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. तर येत्या आठवड्यातील भाग पाहायला विसरू नका. 'कॉन्स्टेबल मंजू' सोमवार ते शनिवार रात्री ८:०० वाजता फक्त सन मराठीवर पाहायला मिळेल.