बिग बॉस मराठी २ : घरातल्या आज दोन सदस्यांमध्ये होणार राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 15:29 IST2019-06-11T15:28:06+5:302019-06-11T15:29:24+5:30

किशोरी शहाणे यांनी अभिजीत बिचुकले यांना त्यांचे नाव विचारता माधव आणि बिचुकले मधील मजेशीर संवाद बघायला मिळणार आहे.

Big fight between two contestants toady at bigg boss house | बिग बॉस मराठी २ : घरातल्या आज दोन सदस्यांमध्ये होणार राडा

बिग बॉस मराठी २ : घरातल्या आज दोन सदस्यांमध्ये होणार राडा

ठळक मुद्देटास्क दरम्यान मज्जा तर होईलच पण त्यासोबत भांडण देखील बघायला मिळणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज शाळा भरणार आहे. कारण बिग बॉस यांनी सदस्यांवर शाळा सुटली पाटी फुटली हे साप्ताहिक कार्य सोपावले आहे. या टास्क दरम्यान सदस्य विद्यार्थीच्या वेशामध्ये खूपच छान दिसत आहेत.  या टास्क दरम्यान मज्जा तर होईलच पण त्यासोबत भांडण देखील बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये किशोरी शहाणे यांनी अभिजीत बिचुकले यांना त्यांचे नाव विचारता माधव आणि बिचुकले मधील मजेशीर संवाद बघायला मिळणार आहे.

शाळेमध्य लहान मुल खोड्या काढणारच. नेहाला टास्कमध्ये कान पकडून उभ रहाण्याची शिक्षा मिळाली आहे पण, ती शिक्षा तोडून मस्ती करत असताना शिवला दिसली आणि शिवने तिला खडू फेकून मारला. यावर नेहाने बिग बॉसला तक्रार केली कि शिवने हिंसा केली, इथे शारीरिक हिंसा चालली आहे आणि यावर शिवने देखील उत्तर दिले कि, आता जर हिने गुन्हा केला तर हिला शाळेतून बाहेर काढाव लागेल.

मग शब्दाला शब्द वाढत गेला. घराचे संस्कार जर नीट असले तर मुल चांगले रहातात असे शिवने नेहाला म्हटले. यावर नेहाने आक्षेप घेतला कि, कोणालाही माझ्या घरच्या संस्कारांवर जाण्याचा अधिकार नाही. शिवने माझी नाही माझ्या घरच्यांची माफी मागावी, ज्यास शिवने नकार दिला. किशोरी शहाणे यांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. आता बघू हे भांडण किती विकोपाला जाते.
 

Web Title: Big fight between two contestants toady at bigg boss house