या दिवशी बिग बॉस धडकणार छोट्या पडद्यावर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 11:41 IST2016-09-02T06:11:42+5:302016-09-02T11:41:42+5:30
नुकताच दबंग सलमान खानच्या बिग बॉस या रियालिटी शोच्या दहाव्या सीझनचा प्रोमो झळकला. त्यानंतर रसिकांमध्ये या शोविषयी उत्सुकता वाढू ...
.jpg)
या दिवशी बिग बॉस धडकणार छोट्या पडद्यावर !
न कताच दबंग सलमान खानच्या बिग बॉस या रियालिटी शोच्या दहाव्या सीझनचा प्रोमो झळकला. त्यानंतर रसिकांमध्ये या शोविषयी उत्सुकता वाढू लागलीय. हा शो कधी सुरु होणार याचे अंदाज बांधले जातायत. मात्र आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हा बिग बॉस -10 कधी तुमच्या भेटीला येणार. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिग बॉसचा दहावा सीझन 16 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला दाखल होणार आहे. यंदाच्या शोचं खास आकर्षण म्हणजे सामान्य रसिकांची यातील एंट्री. हा शो रंजक करण्यासाठी यावेळी सेलिब्रिटींसह सामान्य जनतेलाही यांत एंट्री मिळणार आहे. यासाठी तीन मिनिटाचा व्हिडीओ बनवून शोमध्ये का घेण्यात यावं याचं कारण टाकून तो वेबसाईटवर अपलोड करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. यावेळी बिग बॉसच्या घरात एंट्री मारणा-या सेलिब्रिटींमध्ये राधे माँ, कबीर बेदी, सुनील ग्रोव्हर यांची नावं प्रमुख आहेत.