​या दिवशी सुरू होणार बिग बॉस सिझन ११

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 12:47 IST2017-08-14T07:17:22+5:302017-08-14T12:47:22+5:30

बिग बॉस ११ या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमाचे या सिझनचे नियमदेखील खूपच वेगळे असणार आहेत. यंदाच्या ...

The Big Boss Season 11 will start on this day | ​या दिवशी सुरू होणार बिग बॉस सिझन ११

​या दिवशी सुरू होणार बिग बॉस सिझन ११

ग बॉस ११ या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमाचे या सिझनचे नियमदेखील खूपच वेगळे असणार आहेत. यंदाच्या सिझनमध्ये कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सामान्य स्पर्धकांना पैसे मिळणार नाहीयेत. त्यांना त्यांच्या परफॉर्मन्सनुसार पैसे कमवायला लागणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या कार्यक्रमातील स्पर्धकांचे काही क्रिमिनल रेकॉर्ड आहेत का हे देखील तपासले जाणार आहेत. एवढेच नव्हे तर या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना सलमान कार्यक्रम सुरू व्हायच्याआधी भेटणार असल्याचे म्हटले जात आहे.
या सगळ्या कारणांमुळे बिग बॉस हा कार्यक्रम कधी सुरू होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. हा कार्यक्रम १ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे म्हटले जात आहे. बिग बॉस या कार्यक्रमाच्या आतापर्यंतच्या सगळ्या सिझनचा सेट हा लोणावळ्याला होता. तिथेच हे बिग बॉसचे घर असून सलमान दर आठवड्याला चित्रीकरणासाठी लोणावळ्यालाच असतो. यंदाच्या सिझनचा सेटदेखील लोणावळ्याला असून सध्या या सेटचे जोरदार काम सुरू आहे. 
बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी हजेरी लावणार असल्याचे म्हटले जात आहे. या कार्यक्रमात निया शर्मा झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. निया शर्माने जमाई राजा या मालिकेत काम केले होते. तिला सेक्सी वुमेन इन एशिया हा किताब देखील मिळालेला आहे. ती खतरों के खिलाडी या कार्यक्रमातही झळकली होती. बिग बॉस या कार्यक्रमासाठी तिला दोन करोड रुपये देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय या कार्यक्रमात शिल्पा शिंदे, सना सईद, अंचित कौर, गीता फोगट, कबिर बेदी यांसारखे कलाकार हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे. 

Also Read : ‘बिग बॉस’ फेम लोकेश कुमारीने घटविले वजन; नव्या लूकमध्ये दिसते एकदम फिट !

Web Title: The Big Boss Season 11 will start on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.