बिग बॉस : सलमानने प्रियंकाची केली घरातून हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 18:33 IST2016-12-24T17:24:53+5:302016-12-24T18:33:24+5:30
सलमानच्या ‘वीकेण्ड का वॉर’ या एपिसोडची प्रेक्षकांना जेवढी प्रतीक्षा असते तेवढीच भीती घरातील सदस्यांमध्ये असते. कारण सलमान ज्या पद्धतीने ...
.jpg)
बिग बॉस : सलमानने प्रियंकाची केली घरातून हकालपट्टी
All the housemates applaud as @beingsalmankhan tells these words to #PriyankaJagga after which she walks out! #BB10WeekendKaVaarpic.twitter.com/DKuBtLDjHa— Bigg Boss (@BiggBoss) December 24, 2016}}}} ">http://
}}}} ">All the housemates applaud as @beingsalmankhan tells these words to #PriyankaJagga after which she walks out! #BB10WeekendKaVaarpic.twitter.com/DKuBtLDjHa— Bigg Boss (@BiggBoss) December 24, 2016
All the housemates applaud as @beingsalmankhan tells these words to #PriyankaJagga after which she walks out! #BB10WeekendKaVaarpic.twitter.com/DKuBtLDjHa— Bigg Boss (@BiggBoss) December 24, 2016
त्याचे झाले असे की, गेल्या आठवड्यात बिग बॉसने दिलेल्या ‘प्यार का तोहफा’ या टास्कदरम्यान प्रियंका जग्गा आणि स्वामी ओम हिने घरातील सर्वच सदस्यांना हैराण केले होते. यामुळे संतप्त झालेल्या घरातील सर्व सदस्यांनी एकजूट होत तिच्यावर कारवाई केली जावी अशी बिग बॉसकडे मागणी केली होती. त्याचबरोबर ‘वीकेण्ड का वॉर’ शोमध्ये ती सलमानच्या रडारवर असेल अशी कूजबूजही घरातील सदस्यांमध्ये केली जात होती.
त्यानुसारच ‘वीकेण्ड का वॉर’ शोमध्ये जेव्हा सलमानने घरातील सदस्यांना या आठवड्याचा खलनायक कोण? असे विचारले. तेव्हा स्वामी ओम व्यतिरिक्त सर्वांनीच तिला नॉमिनेट केले. सलमानने तिला याचा जाब विचारण्यास सुरुवात केली. सलमान म्हणाला की, ‘प्रियंका, तू गेल्या आठवड्यात घरात सर्वांत जास्त शिव्या दिल्यास’ त्यावर प्रियंकाने लगेचच ‘आणखी शिव्या देणार’ असे म्हटले. यावर संतप्त झालेल्या सलमानने प्रियंकाला, तुझी ही वागणूक खपवून घेतली जाणार नाही असे ठणकावले.
.@beingsalmankhan takes a huge step by acknowledging the right & the wrong on this #BB10WeekendKaVaar in the most effective way! Don't miss! pic.twitter.com/5y3Zk1dyKM— Bigg Boss (@BiggBoss) December 24, 2016}}}} ">http://
}}}} ">.@beingsalmankhan takes a huge step by acknowledging the right & the wrong on this #BB10WeekendKaVaar in the most effective way! Don't miss! pic.twitter.com/5y3Zk1dyKM— Bigg Boss (@BiggBoss) December 24, 2016
.@beingsalmankhan takes a huge step by acknowledging the right & the wrong on this #BB10WeekendKaVaar in the most effective way! Don't miss! pic.twitter.com/5y3Zk1dyKM— Bigg Boss (@BiggBoss) December 24, 2016
सलमानचे हे शब्द ऐकताच प्रियंकाने आरडा-ओरड करीत रडायला सुरुवात केली, परंतु सलमानने ‘तुझे हे नाटकं खपवून घेतले जाणार नाहीत’ असे म्हणत ‘तुला घरात जमत नसेल तर लगेचच माझ्या घरातून बाहेर पड’ अशा शब्दात ठणकावले. तसेच सलमानने कलर्सलाही दम देत म्हटले की, जर प्रियंका कलर्स चॅनेलवर पुन्हा कधी दिसली तर मी कधीच कलर्ससोबत काम करणार नाही’ सलमानचे हे बोलणे ऐकल्यानंतर प्रियंका थयथयाट करीत घराबाहेर पडली.
मात्र त्याचबरोबर प्रियंकाची ही एक्झिट घरातील सदस्यांसाठी एक प्रकारची चेतावणीच ठरली. या शोचा होस्ट म्हणून सलमान काय करू शकतो, हे त्याने दाखवून देत असतानाच घरातील सदस्यांना वर्तुवणुकीत सुधार आणण्याचा एक प्रकारे इशारा दिला. सलमानचा हा अंदाज कदाचित स्वामी ओम यांना पसंत आला नाही. मात्र त्यांच्यासाठी ही एकप्रकारची चेतावणीच ठरली.
After getting under everyone's skin, @beingsalmankhan himself shows #PriyankaJagga her way out of the house on #BB10WeekendKaVaar! pic.twitter.com/rECOfEmq1s— Bigg Boss (@BiggBoss) December 24, 2016 ">http://
}}}}After getting under everyone's skin, @beingsalmankhan himself shows #PriyankaJagga her way out of the house on #BB10WeekendKaVaar! pic.twitter.com/rECOfEmq1s— Bigg Boss (@BiggBoss) December 24, 2016