​बिग बॉस : सलमान देणार मोना आणि मनुला ‘स्पेशल सरप्राईज’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 13:07 IST2016-12-03T13:07:46+5:302016-12-03T13:07:46+5:30

बिग बॉसच्या घरातील ड्रामा काही कमी होत नाही. प्रेक्षकांना कसे खिळवून ठेवायचे हे शोच्या निर्मात्यांना चांगलेच माहित आहे. सलमान ...

Big Boss: Salman gets Mona and Manula 'Special Surprise' | ​बिग बॉस : सलमान देणार मोना आणि मनुला ‘स्पेशल सरप्राईज’

​बिग बॉस : सलमान देणार मोना आणि मनुला ‘स्पेशल सरप्राईज’

ग बॉसच्या घरातील ड्रामा काही कमी होत नाही. प्रेक्षकांना कसे खिळवून ठेवायचे हे शोच्या निर्मात्यांना चांगलेच माहित आहे. सलमान खान तर प्रत्येक सीझनसह अधिकच एक्सपर्ट होत आहे. स्पर्धकांना दर वेळी काही ना काही सरप्राईज देऊन ‘शॉक’ देणे ही तर त्याची खासियत आहे.

या विकेंडलासुद्धा असे काहीसे ‘शॉकिंग’ ट्विस्टस् आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशेष करून मोना आणि मनूला सलमान खास सरप्राईज देणार आहे. ते सरप्राईज म्हणजे मोना आणि मनूचे रिअल प्रियकर या विकेंडला बिग बॉसच्या घरी येणार असून आपापल्या प्रियकरांना त्यांच्या रिलेशनशिपविषयी जाब विचारणार आहेत.

शोमध्ये मोना आणि मनूची वाढती सलगी पाहता दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. बऱ्याच जणांना ते प्रेमात आहेत असे वाटते. परंतु दोघांनी अशा बातम्यांचे खंडन करून आम्ही केवळ ‘बेस्ट फ्रेंडस् आहोत असे सांगितले. पण आता नेमके खरे काय आणि खोटे काय याचा सोक्षमोक्ष त्यांना आपापल्या प्रियकरांसमोर करायचा आहे.


बिग बॉस होस्ट : सलमान खान

सुत्रांनुसार, मोनाचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंग राजपूत आणि मनूची होणारी पत्नी प्रिया सैनी विकेंड स्पेशल एपिसोडसाठी बिग बॉसच्या घरात येणार आहे. मनू आणि मोनाला ते त्यांच्या ‘सो कॉल्ड’ नात्याबद्दल खुलासा मागताना दिसणार आहेत. म्हणजे या विकेंडला धमाल ड्रामा पाहायला मिळणार तर.

मोनाचा बॉयफ्रेंड शोच्या पूर्वी तिच्याशी लग्न करण्याचा विचार करत होता. परंतु शोमध्ये तिची मनूशी वाढती सलगी पाहून त्याने लग्नाबाबत फेरविचार करण्याचा निर्णय घेतला. तिकडे प्रियाने मोनाला ‘डेस्पो’ (मागे पडणारी) म्हटले होते. आता हे चौघे एकत्र आल्यावर काय होणार हेच कळत नाही!

Web Title: Big Boss: Salman gets Mona and Manula 'Special Surprise'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.