​बिग बॉस : ओम स्वामींना दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 11:54 IST2016-12-03T11:54:24+5:302016-12-03T11:54:24+5:30

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्यासाठी एलिमिनेशनचे नॉमिनेशन लागते. पण स्वयंघोषित बाबा ओम स्वामींना नॉमिनेट केल्याशिवाय बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ...

Big Boss: The road out to OM Swamy is shown | ​बिग बॉस : ओम स्वामींना दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता

​बिग बॉस : ओम स्वामींना दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता

ग बॉसच्या घरातून बाहेर पडण्यासाठी एलिमिनेशनचे नॉमिनेशन लागते. पण स्वयंघोषित बाबा ओम स्वामींना नॉमिनेट केल्याशिवाय बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

गेल्या आठवड्यात त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. याच कारणामुळे त्यांना बिग बॉसचे घर सोडून जावे लागले.

त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्याच्या ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनवणीसाठी कोर्टाने ओम स्वामींना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. सुत्रांनुसार पोलिसांनी बिग बॉसच्या घरी जाऊन स्वामींचे महत्त्वाच्या कागदपत्रांवर हस्ताक्षर घेतले.

मुख्य महानगर दंडाधिकारी सतीश कुमार अरोरा यांनी मागच्या आठवड्यात स्वामींविरोधात अजामीपात्र अटक वॉरंट बजावले होते. २००८ साली विनोदानंद झा ऊर्फ ओम स्वामी यांच्या विरोधात दुकानफोडून चोरी करण्याचा गुन्हा त्यांच्याच लहान भावानेदाखल केला होता.


विवादित व्यक्तीमत्त्व : सलमान खान आणि ओम स्वामी

त्याच खटल्याच्या सुनवणीसाठी ओम स्वामींना उपस्थित राहणे अनिवार्य असल्यासमुळे बिग बॉसच्या घरातून ते बाहेर पडले.

असे अचानक बाहेर पडल्यामुळे इतर स्पर्धकांनासुद्धा धक्का बसला. वाईल्ड कार्डने बिग बॉसच्या घरात आलेल्या स्पर्धकांनी स्वामीच्या वॉरंटची कल्पना दिली होती. आता बाहेर पडलेले स्वामी सुनवणीनंतर परत घरात परतणार याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.

स्वामींवर २००८ साली नोव्हेंबर महिन्यात तीन जणांसोबत मिळून भावाच्या दुकानातून ११ सायकल, महागडे स्पेअर पार्टस्, घराचे आणि इतर महत्त्वाचे कागदपत्रे चोरण्याचा आरोप आहे. 

Web Title: Big Boss: The road out to OM Swamy is shown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.