बिग बॉस : प्रियंकाच्या भावाने म्हटले ‘सलमानचा टीआरपीसाठी आटापिटा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 18:37 IST2016-12-25T18:31:27+5:302016-12-25T18:37:36+5:30

बिग बॉस शोच्या पहिल्याच आठवड्यात घराबाहेर पडलेल्या अन् पुन्हा वाइल्ड कार्डच्या माध्यमातून घरात एंट्री करणाºया प्रियंका जग्गा हिला तिच्या वर्तणुकीमुळे सलमान खानने थेट घराबाहेरचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या तिच्या भावाने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करीत सलमानसह बिग बॉसवर टीकेची झोड उठवली आहे.

Big Boss: Priyanka Chopra says, "Salman tries for TRP" | बिग बॉस : प्रियंकाच्या भावाने म्हटले ‘सलमानचा टीआरपीसाठी आटापिटा’

बिग बॉस : प्रियंकाच्या भावाने म्हटले ‘सलमानचा टीआरपीसाठी आटापिटा’

ग बॉस शोच्या पहिल्याच आठवड्यात घराबाहेर पडलेल्या अन् पुन्हा वाइल्ड कार्डच्या माध्यमातून घरात एंट्री करणाºया प्रियंका जग्गा हिला तिच्या वर्तणुकीमुळे सलमान खानने थेट घराबाहेरचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या तिच्या भावाने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करीत सलमानसह बिग बॉसवर टीकेची झोड उठवली आहे. 
">http://
अश्लाघ्य भाषेत शिव्यांची लाखोली वाहत घरातील सदस्यांना सळो की पळो करणाºया प्रियंका जग्गाला संतप्त झालेल्या सलमानने थेट घराबाहेरचा रस्ता दाखविला होता. मात्र ती घराबाहेर पडताच तिचा भाऊ समीर जग्गा याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून सलमानसह बिग बॉसवर टीका केली. त्याने म्हटले की, हा सर्व टीआरपीचा खेळ आहे. सलमानने शोची टीआरपी वाचविण्यासाठी अशाप्रकारचा शेवट दाखविण्याचा खटाटोप केला आहे. ज्यामुळे संपूर्ण भारतात खळबळ उडून लोकांनी हा शो बघावा हाच यामागचा निर्मात्यांचा उद्देश आहे. यावेळी समीर जग्गाने बहीण प्रियंकासोबतचे दोन फोटोही शेअर केले आहेत. फोटो कॅप्शनमध्ये लिहिले की, प्रियंका आणि मी दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलजवळ उभे आहोत.
बिग बॉसने वारंवार चेतावणी देऊनदेखील घरात आपल्या वर्तणुकीत सुधारणा न करणाºया प्रियंका जग्गाला सलमानने जबरदस्त फटकारत घराबाहेर काढले होते. तसेच तिला खलनायकाच्या खुर्चीवर बसून, तिने केलेले कारनामे सर्वांसमक्ष दाखवित तिचा खरा चेहरा उघड केला होता. प्रियंकानेदेखील सलमानला फारसे गांभीर्याने न घेता घरातून बाहेर पडण्यास उत्सुक असल्याचे दाखवून दिले होते. 
बिग बॉस शोच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारचा ड्रामा घडल्याने आता त्यास प्रियंका जग्गा कशापद्धतीने उत्तर देते, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. कारण अजूनपर्यंत प्रियंकाने याविषयी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Web Title: Big Boss: Priyanka Chopra says, "Salman tries for TRP"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.