​बिग बॉस मराठी आहे स्क्रिप्टेड?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 05:56 AM2018-05-15T05:56:09+5:302018-05-15T11:26:09+5:30

बिग बॉस हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. या कार्यक्रमाचे सगळेच सिझन आजवर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. या कार्यक्रमाचा ११ ...

Is Big Boss Marathi Is Scripted? | ​बिग बॉस मराठी आहे स्क्रिप्टेड?

​बिग बॉस मराठी आहे स्क्रिप्टेड?

googlenewsNext
ग बॉस हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. या कार्यक्रमाचे सगळेच सिझन आजवर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. या कार्यक्रमाचा ११ वा सिझन जानेवारी महिन्यात संपला असून शिल्पा शिंदे या सिझनची विजेती बनली. बिग बॉसचे आजवर ११ सिझन झाले असून सगळेच सिझन वादात राहिले आहेत. बिग बॉस हा कार्यक्रम एक रिअॅलिटी शो असून काही सेलिब्रेटी एकाच घरात राहातात आणि त्यानंतर त्यांच्यात काही वाद होतात, तर काही वेळा अनेकांमध्ये खूप चांगली मैत्री होते. काही वेळा तर काहीजणांमध्ये प्रेमांकूर फुलताना देखील दिसतात. बिग बॉस या कार्यक्रमाच्या यशानंतर हा कार्यक्रम दाक्षिणात्य, बंगाली अशा विविध भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आता हा कार्यक्रम प्रेक्षकांना मराठीत पाहायला मिळत आहे. मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रेटी आपल्याला या घरात दिसत आहेत. या सेलिब्रेटींमध्ये आरती सोलंकी, आस्ताद काळे, भूषण कडू, जुई गडकरी, मेघा धाडे, पुष्कर जोग, राजेश शृंगारपुरे, रेशम टिपणीस, ऋतुजा धर्माधिकारी, सई लोकुर, स्मिता गोंदकर, सुशांत शेलार, विनीत भोंडे, अनिल थत्ते आणि उषा नाडकर्णी यांचा समावेश आहे. यातील काही स्पर्धक आता घराच्या बाहेर देखील पडले आहेत. बिग बॉस हिंदी प्रमाणेच मराठीत देखील स्पर्धकांमध्ये प्रचंड भांडणं होत आहेत. एकमेकांबद्दल वाईट बोलले जात आहे. त्याचप्रमाणे बिग बॉसप्रमाणेच आता बिग बॉस मराठी मध्ये देखील एक प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
बिग बॉस या कार्यक्रमाचे आजवर अनेक सिझन झाले असून ते प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. पण हा कार्यक्रम हा स्क्रिप्टेड असतो असा प्रेक्षकांचा आक्षेप आहे. पण बिग बॉस मराठी देखील स्क्रिप्टेड असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपूरे यांच्यात आता प्रेमकथा फुलू लागली आहे. राजेशने नुकत्याच झालेल्या भागात कॅमेऱ्यासमोर येऊन रेशमला आय लव्ह यू म्हटले आहे. एवढेच नव्हे तर मी माझ्या पत्नीला सांगतोय की, रेशम आय लव्ह यू.... असे तो म्हणाला.
रेशम आणि राजेशची प्रेमकथा गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सगळ्यावर राजेशच्या पत्नीची प्रतिक्रिया काय असेल याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. पण राजेशची पत्नीने अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या सगळ्यामुळे राजेश आणि रेशम हे प्रेमाचे नाटक करत असून राजेश घरात जाऊन कसा वागणार याची कल्पना त्याच्या पत्नीला आधीच त्याने दिली असेल अशी जोरदार चर्चा रंगली आहे. 

Also Read : ही आहे राजेश शृंगारपुरेची पत्नी, बिग बॉस मराठीमध्ये रेशम टिपणीससोबत असलेल्या नात्यामुळे सध्या चर्चेत आहे राजेश


Web Title: Is Big Boss Marathi Is Scripted?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.