रणवीर भैयाने सबको बिगाड दिया...! आता ‘बिग बॉस’ फेम असिम रियाजच्या फोटोंची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 17:08 IST2022-08-01T17:01:42+5:302022-08-01T17:08:03+5:30
Asim Riaz photoshoot : असिमने फोटो शेअर केलेत आणि ते क्षणात व्हायरल झालेत. मग काय, या फोटोंवरही प्रतिक्रिया उमटल्या.

रणवीर भैयाने सबको बिगाड दिया...! आता ‘बिग बॉस’ फेम असिम रियाजच्या फोटोंची चर्चा
Asim Riaz photoshoot : रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) न्यूड फोटोशूटची चर्चा अद्यापही सुरू आहे. या फोटोशूटचे फोटो व्हायरल झालेत आणि लोकांनी रणवीरला धारेवर धरलं. सोशल मीडियावर तो जबरदस्त ट्रोल झाला. केवळ इतकंच नाही तर त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल झाली. काही लोकांनी मात्र रणवीरला सपोर्ट केल्याचंही यादरम्यान पाहायला मिळालं. इंडस्ट्रीतल्या अनेकांनी त्याला सपोर्ट केला. इंडस्ट्रीतल्या काही कलाकारांनी तर यापुढे जात रणवीरला सपोर्ट म्हणून असंच न्यूड फोटोशूट करवून घेतलं. आता यात अभिनेता असिम रियाजचं (Asim Riaz) नावही सामील झालं आहे.
रणवीरच्या न्यूड फोटोशूटनंतर ‘बिग बॉस’ फेम असिम रियाजने एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. त्याचे हे फोटो अर्थात जुने आहेत. हे सगळे फोटो, व्हिडीओ 2017 मधील असल्याचं त्याने म्हटलं आहे. पण 2017 मधील हे फोटो असिमने आता शेअर केलेत आणि ते क्षणात व्हायरल झालेत. मग काय, या फोटोंवरही प्रतिक्रिया उमटल्या.
रणवीर भाईने सबको बिगाड दिया, अशी कमेंट एका युजरने केली. हे आता अति होतंय, अशा आशयाच्या कमेंट्सची काहींनी केल्या. काहींनी अतिशय वाईट पद्धतीने असिमला ट्रोल केलं.
असिम हा एक फिटनेस फ्रिक अभिनेता आहे. एकही दिवस तो जिम चुकवत नाही. रूटीन वर्कआऊट करून त्याने मस्कुलर बॉडी बनवली आहे. ‘बिग बॉस’मधून असिम रियाज दिसला होता.