बिग बॉस फेम मंदना करिमी खोटं बोलतेय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 12:24 IST2017-07-29T06:54:41+5:302017-07-29T12:24:41+5:30

बिग बॉस फेम मंदना करिमी आणि गौरव गुप्ता यांचे लग्न होऊन काहीच महिने झाले आहेत. पण गौरवने माझा शारीरिक ...

Big Boss Fade Bless Karami Khote? | बिग बॉस फेम मंदना करिमी खोटं बोलतेय का?

बिग बॉस फेम मंदना करिमी खोटं बोलतेय का?

ग बॉस फेम मंदना करिमी आणि गौरव गुप्ता यांचे लग्न होऊन काहीच महिने झाले आहेत. पण गौरवने माझा शारीरिक आणि मानसिक अत्याचार केला असल्याचे म्हणत मंदनाने त्याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. तसेच दरमहा १० लाख पोटगी आणि आपल्या करिअरच्या नुकसानभरपाईपोटी दोन कोटी रुपये देण्याची मागणीही तिने केली आहे. 
मंदना आणि गौरवच्या लग्नाला केवळ सहा महिने झाले असतानाच जानेवारीमध्ये मंदनाने त्याच्याविरोधात ही तक्रार दाखल केली. मंदनाला गौरवने घराच्या बाहेर काढले असून तिला घरात येण्यास मज्जाव करण्यात आला असल्याचे देखील तिने त्यावेळी म्हटले होते. 
पण या प्रकरणाची एक वेगळी बाजू स्पॉटबॉय या वेबसाईटने लोकांसमोर आणली आहे. मंदनाने तिच्या नवऱ्यावर आणि सासरच्या मंडळींवर जे आरोप केले आहेत, त्यात तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंदनाच्या दीराचे काही महिन्यांपूर्वी लग्न ठरत होते. पण मंदनाशिवाय कोणतीही स्त्री त्यांच्या घरात असू नये असे मंदनाला वाटत असल्याने तिने या लग्नाला नकार दिला. मंदनाने गुप्ता कुटुंबियांच्या अब्रूचे धिंधवडे काढले आहे असे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. मंदनाच्या दीराचे अभिनेत्री स्मृती खन्नासोबत प्रेमसंबंध असून ते लग्नाचा विचार करत होते. पण त्यांच्या लग्नाला मंदनाने विरोध केला. स्पॉटबॉय या वेबसाईटने मंदनाच्या दीराला याबाबत विचारले असता त्याने सांगितले, योग्य वेळ येईल तेव्हा या प्रकरणाबाबत मी नक्कीच बोलले. सध्या तरी मला या प्रकरणावर काहीही भाष्य करायचे नाहीये. 
आता या सगळ्या प्रकरणानंतर मंदना आणि गौरवच्या कुटुंबीयांमध्ये खरे कोण बोलत आहे तोच प्रश्न पडला आहे. 

Also Read : ​पहिल्या‘गे’ पतीला सोडून मंदना करिमी झाली मंदना गुप्ता!!

Web Title: Big Boss Fade Bless Karami Khote?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.