बिग बॉसची EX कंटेस्टंट हिना खानने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 15:44 IST2018-01-16T10:14:22+5:302018-01-16T15:44:22+5:30

बिग बॉसच्या घरात हिना खानसबरोबर तिच्या आणखी एका मित्राचीही जोरदार चर्चा झाली. ती व्यक्ती म्हणजे तिचा बॉयफ्रेंड रॉकी.होय,  घरात ...

Big Boss EX Contestant Hina Khan first love love confession! | बिग बॉसची EX कंटेस्टंट हिना खानने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली!

बिग बॉसची EX कंटेस्टंट हिना खानने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली!

ग बॉसच्या घरात हिना खानसबरोबर तिच्या आणखी एका मित्राचीही जोरदार चर्चा झाली. ती व्यक्ती म्हणजे तिचा बॉयफ्रेंड रॉकी.होय,  घरात भेटायला आलेल्या रॉकीला पाहून हिना खूप भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले होते.हिनाला सपोर्ट करण्यासाठी रॉकी बिग बॉसच्या फिनालेमध्ये पोहोचला होता. येवढेच नाही तर सोशल मीडियावर हिनाविषयी जो कुणी कमेंट करत होते, त्यांना उत्तर देण्याचे काम रॉकी करत होता. रॉकी हा पूर्वी 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करत होता.त्याचवेळी दोघेही प्रेमात पडले होते. ब-याचदा हिना रॉकीसह लग्न करणार असल्याच्या वावड्याही उठल्या.जिथे शक्य होईल तिथे रॉकी हिनाबरोबर उपस्थित असतो. फक्त बिग बॉसच नाही तर 'खतरों के खिलाडी 8 पर्व'वेळी स्पेनमध्येही रॉकी सतत तिच्याबरोबर होता. त्यामुळे जेव्हा जेव्हा हिनाला लग्नाविषयी विचारल्या गेल्या प्रश्नावर तिने मौन पाळणेच पसंत केल्याचे पाहायला मिळाले.हिनाने कधीच उघडपणे आपले प्रेम जाहीर केले नव्हते.मात्र बिग बॉसच्या घराबाहेर येताच तिने पहिल्यांदाच तिच्या प्रेमाची कबुली दिली. त्यामुळे पुन्हा एकदा  तिला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, सध्या काही विचार नाही.आम्ही दोघे एकत्र खुप खुश आहोत आणि आमच्या नात्याविषयी लोकांना माहिती आहे यामुळे मी खुप खुश असल्याचे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे.


हिना आणि रॉकी बिग बॉसच्या घरात साखरपुडा करणार असल्याची चर्चा रंगली होती.बिग बॉसच्या प्रोमोमध्ये रॉकी हिनाच्या हातात अंगठी घालत असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यामुळे ती आता नॅशनल टिव्हीवर साखरपुडा करणार अशी उत्सुकता होती.अगदी त्याचप्रमाणे रॉकीने हिनाला रिंग घालताना दाखवले गेले होते.रॉकीला पाहताच हिना खानला अश्रृ अनावर झाले होते.हिना खानला कोसळलेल रडु पाहुन तिला सोशल मीडियावरही चाहत्यांनी तिचे हे रूप पाहुन संमिश्र प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले होते.

Web Title: Big Boss EX Contestant Hina Khan first love love confession!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.