Bigg Boss 15 Premiere: सलमान खान धमाकेदार एंट्री, पहिला कंटेस्टेंट बनला जय भानुशाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 22:54 IST2021-10-02T22:54:23+5:302021-10-02T22:54:39+5:30
'बिग बॉस सीझन 15' मध्ये, एक विशेष सदस्याने प्रवेश केला आहे. जंगलात राहणारा हा गोरिल्ला आहे, तो सलमान खानच्या मदतीसाठी आला आहे.

Bigg Boss 15 Premiere: सलमान खान धमाकेदार एंट्री, पहिला कंटेस्टेंट बनला जय भानुशाली
सलमान खानने होस्ट केलेला हा रिअॅलिटी शो प्रत्येक वेळी नवीन ट्विस्ट घेऊन येतो. यावेळी बिग बॉस 15 मध्ये, सेलिब्रिटी स्पर्धकांना मुख्य घरात प्रवेश करण्यापूर्वी जंगलात अनेक 'संकटांमधून' जगावे लागले. जंगलात त्यांना 'विश्व सुंदरी'चीही भेट होती.आपल्या आवाजाने विश्वसुंदरी स्पर्धकांना प्रभावित करते.यावेळी 'विश्व सुंदरी'ला आवाज ऐकायला मिळणे हे देखील घराचे खास आकर्षण आहे.
यावेळी बिग बॉस सीझन 15 मध्ये, एक विशेष सदस्याने प्रवेश केला आहे. जंगलात राहणारा हा गोरिल्ला आहे, तो सलमान खानच्या मदतीसाठी आला आहे. यासह, जादूई मिरर स्पर्धकांना सांगेल की घरात एंट्री करणारे स्पर्धक कोणत्या प्राण्याशी जुळतात.
तेजस्वी प्रकाश घरात एंट्री करणारी दुसरी स्पर्धक ठरली विशाल कोटियन तिसरा स्पर्धक ठरला. एंट्री करण्यापूर्वी विशाल कोटियनने त्याच्याविषयी अनेक गोष्टी सलमानला सांगितल्या. तो एका गॅरेज मालकाचा मुलगा आहे आणि त्याने खूप मेहनत करुन आपले शिक्षण, करिअर बनवले आहे.
तेजस्वीने देखील ती फक्त शो जिंकण्यासाठी आली आहे. कारण मागील रिअॅलिटी शो खतरों के खिलाडी ती जिंकू शकली नव्हती. म्हणूनच आता त्या विजयाची भूक असल्याचे तिने सांगितले. बिग बॉस जिंकणे हेच तिचे ध्येय असल्याचे तिने सांगितले. तिसरी स्पर्धकाची एंट्री झाली ती विधि पंड्या, आणि चौथ्या स्पर्धकाची एंट्री झाली तो स्पर्धक ठरला सिंबा नागपाल.
सलमान खानने बिग बॉस 15 चा प्रीमियर जल्लोषात सुरू झाला आहे. डान्स दिवानेच्या स्पर्धकांसोबत सलमानने जंगल है आधि रात है या गाण्यावर एक डान्सही केला.
आकर्षक नृत्य केले आहे. प्रेक्षकांचे स्वॅगसह स्वागत केले. त्याचवेळी, शोमध्ये बिग बॉसच्या पहिल्या स्पर्धकाचे स्वागत करण्यात आले, जय भानुशाली पहिला स्पर्धक ठरला. सलमान खानसोबत जयने शोबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या,