'तारक मेहता'मधील भिडे मास्तर उर्फ मंदार चंदावरकर प्रत्येक एपिसोडसाठी घेतो इतके मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 20:29 IST2020-09-24T20:29:04+5:302020-09-24T20:29:30+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील भिडे मास्तर म्हणजेच अभिनेता मंदार चंदावरकरची एक दिवसाची कमाई किती आहे हे वाचल्यावर तुम्ही चकीत व्हाल.

'तारक मेहता'मधील भिडे मास्तर उर्फ मंदार चंदावरकर प्रत्येक एपिसोडसाठी घेतो इतके मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतील बहुतांश कलाकारांची ही पहिलीच मालिका होती. पण त्यांच्या पहिल्याच मालिकेने त्यांना खूप फेमस बनवले. आज जेठालाल, दया, आत्माराम भिडे, माधवी भिडे, तारक मेहता, अंजली, अय्यर, बबिता, टप्पू, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून टिआरपीच्या रेसमध्ये देखील अव्वल आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील कलाकारांची लोकप्रियता पाहता ते एका एपिसोडसाठी चांगलेच मानधन घेत असतील. या मालिकेतील भिडे मास्तर म्हणजेच अभिनेता मंदार चंदावरकरची एक दिवसाची कमाई किती आहे हे वाचल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेती प्रत्येक भागासाठी मंदार चंदावरकर ८०,००० रुपये मानधन घेतात. हा आकडा वाचल्यावर तुम्ही चक्रावून गेलात ना.
याशिवाय मंदार चंदावरकरने तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेशिवाय सीआयडी मालिकेत काम केले आहे. तसेच त्याने मिशन चँम्पियन, दोघात तिसरा आता सगळे विसरा या चित्रपटातही काम केले आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका २००८ सालापासून प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करत आहे. आतापर्यंत या मालिकेने ३००० एपिसोड पूर्ण केले आहेत.