'लाफ्टर क्वीन' भारती सिंहला दुसऱ्या प्रेग्नंसीत झालाय हा आजार, डॉक्टरही ओरडले; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 15:17 IST2025-11-16T15:17:00+5:302025-11-16T15:17:40+5:30
भारती सिंहने व्यक्त केली चिंता

'लाफ्टर क्वीन' भारती सिंहला दुसऱ्या प्रेग्नंसीत झालाय हा आजार, डॉक्टरही ओरडले; म्हणाली...
लाफ्टर क्वीन भारती सिंह दुसऱ्यांदा गरोदर आहे. काही महिन्यात ती दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. भारतीला गोला हा पहिला मुलगा आहे. तर आता तिला मुलगी हवी असल्याची तिने इच्छा व्यक्त केली आहे. भारतीचं वय ४१ आहे. या वयात दुसऱ्या प्रेग्नंसीमध्ये तिला एका आजाराचा सामना करावा लागत आहे. याविषयी नुकतंच तिने तिच्या युट्यूब व्लॉगमध्ये सांगितलं. तिला डॉक्टरही ओरडले असं ती म्हणाली. भारतीला नक्की काय झालंय?
व्लॉगमध्ये भारती सिंह सांगते, "मी काहीही गोड खात नाहीये. फक्त सकाळी एक कप चहा घेते. नंतर काहीच गोड नाही. मी गोंधळून गेले आहे कारण मी काहीच गोड खात नाहीये. असं का होतंय? हर्ष सुद्धा इथे नाहीये तो दुबईला गेला आहे. रात्रीपर्यंत येईल. मला त्याच्याशिवाय खूप एकटं वाटत आहे. मला रडावं वाटतंय. मी काहीच खात नाहीये तरी सुद्धा शुगर का वाढतीये? मी तर काहीच स्ट्रेसही घेत नाहीये."
ती पुढे म्हणते, "मी माझ्या आहाराबाबतीत एकदम काटेकोर आहे. मी गहू सुद्धा खात नाहीये फक्त मिलेट खाते. का कोण जाणे असं का होतंय. मला फारच टेन्शन आलंय. या सगळ्याचा बाळावर परिणाम होऊ नये. मला डॉक्टरही खूप ओरडले."
भारती सिंहने स्वित्झर्लंडमध्ये असताना दुसऱ्या प्रेग्नंसीची मजेशीररित्या घोषणा केली होती. पहिल्या प्रेग्नंसीवेळीही भारतीने खूप काम केलं. यावेळीही ती काम करत आहे. तसंच गोलाच्या जन्मानंतर काहीच दिवसात ती पुन्हा कामावर परतली होती.