भारती सिंग बॉलिवूडमधील या सेलिब्रिटींना देणार लग्नाचे आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 12:50 IST2017-11-02T05:52:07+5:302017-11-02T12:50:07+5:30

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग लवकरच तिचा प्रियकर हर्ष लिम्बाचियासोबत लग्न करणार आहे. तिचे लग्न ३ डिसेंबरला होणार असून तिच्या ...

Bharti singh will invite the celebrity for this celebrity | भारती सिंग बॉलिवूडमधील या सेलिब्रिटींना देणार लग्नाचे आमंत्रण

भारती सिंग बॉलिवूडमधील या सेलिब्रिटींना देणार लग्नाचे आमंत्रण

रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग लवकरच तिचा प्रियकर हर्ष लिम्बाचियासोबत लग्न करणार आहे. तिचे लग्न ३ डिसेंबरला होणार असून तिच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. तिचे लग्न मुंबईत नव्हे तर गोव्यात होणार आहे. तिचे अनेक मित्रमैत्रीण लग्नाच्या आदल्या दिवशीच गोव्याला रवाना होणार आहेत. भारती सध्या कॉमेडी दंगल या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहे. भारती तिच्या कामात व्यग्र असली तरी ती लग्नाच्या तयारीकडे जातीने लक्ष देत आहे. लग्नामध्ये कोणा कोणाला बोलवायचे याची लिस्ट तिने स्वतः काढली आहे. या लिस्ट मध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींचा समावेश आहे. भारती गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात भारती सगळ्यात पहिल्यांदा झळकली होती. त्यानंतर तिने कॉमेडी सर्कसच्या अनेक सिझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला. झलक दिखला जा कार्यक्रमात तिचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. या कार्यक्रमात तिने एकाहून एक सरस नृत्य सादर केले होते. तिने इंडियाज गॉट टायलेंट, कॉमेडी नाईट्स बचाओ यांसारख्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे. 
भारती अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत असून तिच्या अनेक कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. त्यामुळे इंडस्ट्रीतील अनेक जणांना ती लग्नाचे निमंत्रण पाठवणार आहे. याविषयी एका मुलाखतीच्या दरम्यान भारतीने नुकतेच सांगितले आहे की, मी इंडस्ट्रीत खूप वर्षांपासून काम करत असल्याने माझ्या गेस्टची लिस्ट ही खूपच मोठी आहे.  
भारतीच्या गेस्ट लिस्टमध्ये शाहरुख खान, सलमान खान, करण जौहर, माधुरी दीक्षित, मलाईका अरोरा यांसारख्या सेलिब्रिंटींची नावे आहेत. या सगळ्यांना भारती स्वतः जाऊन आमंत्रणं देणार आहे. 
भारती गेल्या आठ वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. त्यामुळे तिने लग्नानंतरचा काही काळ केवळ तिच्या पतीसोबत घालवायचा ठरवला आहे. लग्नानंतर एक महिन्यांनी म्हणजेच जानेवारीत ती पुन्हा काम करायला सुरुवात करणार आहे. 

Also Read : कपिल शर्मा आणि भारतीची जमली गट्टी!

Web Title: Bharti singh will invite the celebrity for this celebrity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.