​भारती सिंग अडकणार लग्नबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 12:57 IST2017-07-19T07:27:28+5:302017-07-19T12:57:28+5:30

भारती सिंग आणि तिचा प्रियकर हर्ष लिम्बाचिया नुकतेच नच बलियेमध्ये झळकले होते. नच बलियेमधील त्यांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली ...

Bharti Singh will be arrested | ​भारती सिंग अडकणार लग्नबंधनात

​भारती सिंग अडकणार लग्नबंधनात

रती सिंग आणि तिचा प्रियकर हर्ष लिम्बाचिया नुकतेच नच बलियेमध्ये झळकले होते. नच बलियेमधील त्यांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. भारती आणि हर्ष गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. ते अनेक वर्षांपासून नात्यात असल्याचे म्हटले जाते. भारती आणि हर्षच्या प्रेमप्रकरणाची गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात चर्चा होती. पण भारतीने यावर मौन राखणेच पसंत केले होते. भारतीने साखरपुडा केल्याची बातमी मीडियामध्ये आल्यानंतर सगळ्यांना त्यांच्या नात्याविषयी कळले होते. 
भारती सध्या तिच्या अनेक कार्यक्रमात व्यग्र आहे. तसेच काही दिवसांपासून तिची तब्येत देखील ढासळली होती आणि त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. पण आता ती लवकरच लग्न करणार असल्याचे कळतेय. भारती आणि हर्ष या वर्षाच्या अखेरीस लग्नबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच या दोघांचा नुकताच रोका मुंबईत झाला असल्याचे म्हटले जात आहे. या त्यांच्या रोका कार्यक्रमाला त्यांच्या जवळचे मित्रमैत्रीण आणि नातलगच उपस्थित होते. त्या दोघांनी या रोका कार्यक्रमाला खूप मजा-मस्ती केली असल्याचे म्हटले जात आहे.
भारती आणि हर्षच्या लग्नाची तयारी सध्या जोरात सुरू आहे. लग्न अतिशय धुमधडाक्यात करण्याचे त्यांनी ठरवले असल्याचे म्हटले जात आहे. अनेकवेळा लग्नाचा खर्च हा केवळ मुलीच्या घरातले करतात. पण भारती आणि हर्षच्या लग्नाचा खर्च त्या दोघांनी मिळून अर्धा-अर्धा करण्याचे ठरवले असल्याचे म्हटले जात आहे. हर्षचा हा विचार भारतीला खूपच आवडला आहे. आपल्याला असा जोडीदार मिळाल्याबद्दल ती स्वतःला नशिबवान समजत असल्याचे कळतेय.  

Also Read : OMG : ​कपिल शर्मा आणि भारतीची जमली गट्टी !

Web Title: Bharti Singh will be arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.