​छोटे मियाँ धाकडच्या ग्रँड फिनालेला भारती सिंगने केली धमाल मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2017 10:34 IST2017-06-22T05:04:57+5:302017-06-22T10:34:57+5:30

छोटे मियाँ धाकड या कार्यक्रमात चिमुकले स्पर्धक त्यांच्या परफॉर्मन्समधून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. हे सगळेच चिमुकले प्रेक्षकांना प्रचंड ...

Bharti Singh, the grand financier, has done a lot of fun | ​छोटे मियाँ धाकडच्या ग्रँड फिनालेला भारती सिंगने केली धमाल मस्ती

​छोटे मियाँ धाकडच्या ग्रँड फिनालेला भारती सिंगने केली धमाल मस्ती

टे मियाँ धाकड या कार्यक्रमात चिमुकले स्पर्धक त्यांच्या परफॉर्मन्समधून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. हे सगळेच चिमुकले प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. हे सगळे एकापेक्षा एक दमदार परफॉर्मन्स सादर करत आहेत. हा कार्यक्रम गेले कित्येक आठवडे प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून आता तो त्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. दिव्यांश द्विवेदी, अगरिमा, काव्या रमाणी, वेदांश पगारे यांच्यामध्ये आता अंतिम सामना रंगणार असून यातून कोण विजेता ठरतेय याची लवकरच निवड होणार आहे. 
छोटे मियाँ या कार्यक्रमाच्या फिनालेचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. या चित्रीकरणाला या कार्यक्रमाचे सगळे स्पर्धक, परीक्षक नेहा धुपिया, सोहेल खान उपस्थित होते. त्याचसोबत या कार्यक्रमात भारती सिंग लालीच्या अवतारात पाहायला मिळाली. भारतीने आजवर लालीच्या अवतारात अनेकवेळा प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रेक्षकांना तिचे हे रूप खूपच आवडते. या कार्यक्रमात देखील तिने प्रेक्षकांना खळखळून हसवले. तसेच दिव्यांशने सलमान आणि सनी देओल यांची मिमिक्री करत परफॉर्मन्स सादर केला तर अगरिमाने शाहरुखची मिमिक्री केली तर छोटीशी काव्या रमाणी सखु-बाई बनली होती तर वेदांश पगारेने क्राइम मास्टर गो गो बनवून सगळ्यांना प्रचंड हसवले. वेदांशचा परफॉर्मन्स तर नेहाला खूपच आवडला होता. त्यामुळे तिने त्याचे खूपच कौतुक केले. एवढेच नव्हे तर नेहाने स्टेजवर येऊन त्याच्या गालावर पपी देखील दिली.
छोटे मियाँ या कार्यक्रमातील सगळेच चिमुकले एकाहून एक तगडे परफॉर्मन्स देत असून त्याच्यातून विजेता कोण ठरेल याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. 

Also Read : ​नेहा धूपिया अशी निवडते मोबाईल, वाईन आणि मित्र!

Web Title: Bharti Singh, the grand financier, has done a lot of fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.