'भाग्य दिले तू मला' मालिकेने गाठला १०० भागांचा टप्पा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 14:53 IST2022-07-27T14:52:07+5:302022-07-27T14:53:49+5:30
कावेरीचं मनं राखण्यासाठी राजनं केलेले सेलिब्रेशन असो वा काकूमुळे बोक्याला इन्व्हेस्टर मिळाला असो वा काकूने राजवर्धन आणि रत्नमालाला एकत्र आणण्यासाठी केलेली मदत असो वा बोक्याने काकूला घरकामात केलेली मदत असो सगळ्याच गोष्टी, घटना प्रेक्षकांना आवडत आहेत.

'भाग्य दिले तू मला' मालिकेने गाठला १०० भागांचा टप्पा !
छोट्या पडद्यावर सध्या काकू - बोक्याची जोडी भलतीच लोकप्रिय होताना दिसून येत आहे. काकू बोक्या म्हणजे नक्की कोण ? असा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर दुसरे कोणी नसून 'भाग्य दिले तू मला' मालिकेतील राजवर्धन आणि कावेरी. राजवर्धन आणि कावेरी आता प्रेक्षकांना आपल्याला घरातील सदस्य वाटू लागले आहेत. मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
मग ते त्यांच्यातील मतभेद असो वा छोटी छोटी भांडण असो वा एकमेकांना केलेली मदत असो. कावेरीचं मनं राखण्यासाठी राजनं केलेले सेलिब्रेशन असो वा काकूमुळे बोक्याला इन्व्हेस्टर मिळाला असो वा काकूने राजवर्धन आणि रत्नमालाला एकत्र आणण्यासाठी केलेली मदत असो वा बोक्याने काकूला घरकामात केलेली मदत असो सगळ्याच गोष्टी, घटना प्रेक्षकांना आवडत आहेत.
इतकेच नसून मालिकेतील त्यांची जोडी प्रेक्षकांना आडवतेच आहे पण, ऑफस्क्रीन देखील त्यांचे धम्माल रील चर्चेत असतात. कावेरी म्हणजे तन्वीचे इन्स्टावर १ लाखाहुन अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांचा हॅशटॅग #राजवेरी देखील बराच व्हायरल होताना दिसून येतो आहे. बघता बघता भाग्य दिले तू मला मालिकेने १०० भागांचा टप्पा यशस्वीरीत्या गाठला आहे.
आता मालिकेत माहेरचा चहा कंपनीच्या वर्धापन दिनच्या दिवशी राज जाणार का? याची उत्सुकता सगळयांनाच लागून राहिली आहे. रत्नमाला आणि राजवर्धन मधला दुरावा काकू दूर करू शकेल का? तर दुसरीकडे, काकू आणि बोक्याचे कोणीतरी फोटोज काढत आहेत कोण असेल ती व्यक्ती ? "माहेरचा चहा" च्या वर्धापन दिना दिवशी सुदर्शन काकाने राजच्या विरोधात कोणता प्लॅन आखलाय? मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं रंजक असणार आहे.