'खतरों के खिलाडी १४'मध्ये दिसणार मराठमोळी अभिनेत्री? 'भाभीजी घर पर है' फेम शिल्पा शिंदेच्या एन्ट्रीची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 11:37 AM2024-05-08T11:37:46+5:302024-05-08T11:38:13+5:30

'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेला 'खतरों के खिलाडी १४'साठी विचारण्यात आल्याची माहिती आहे.

bhabhiji ghar par hai fame actress shilpa shinde to participate in khatron ke khiladi 14 | 'खतरों के खिलाडी १४'मध्ये दिसणार मराठमोळी अभिनेत्री? 'भाभीजी घर पर है' फेम शिल्पा शिंदेच्या एन्ट्रीची चर्चा

'खतरों के खिलाडी १४'मध्ये दिसणार मराठमोळी अभिनेत्री? 'भाभीजी घर पर है' फेम शिल्पा शिंदेच्या एन्ट्रीची चर्चा

टीव्हीवरील अनेक लोकप्रिय रिएलिटी शोपैकी एक म्हणजे 'खतरों के खिलाडी'. चंदेरी दुनियातील सितारे खतरनाक स्टंट करताना या शोमध्ये दिसतात. रोहित शेट्टी या शोमध्ये स्टंट करायला लावून ग्लॅमरस दुनियेतील सेलिब्रिटींना थेट आसमान दाखवतो. 'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोचा लवकरच नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'खतरों के खिलाडी १४'साठी चाहतेही उत्सुक आहेत.  

'खतरों के खिलाडी १४'मध्ये कोणते सेलिब्रिटी दिसणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे. या शोमध्ये सहभाग घेणाऱ्या काही कलाकारांची नावं समोर आली आहेत. 'खतरों के खिलाडी १४'मध्ये मराठमोळी अभिनेत्री दिसण्याची शक्यता आहे. 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेला 'खतरों के खिलाडी १४'साठी विचारण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे शिल्पा शिंदे 'खतरों के खिलाडी १४'मध्ये स्टंट करताना दिसण्याची शक्यता आहे. 

शिल्पा शिंदेआधी मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीच्या नावाचीही चर्चा होती. 'झलक दिखला जा १०'नंतर रोहित शेट्टीने स्वत: गश्मीरला 'खतरों के खिलाडी १४'साठी विचारलं होतं. पण, याबाबत अद्याप गश्मीर किंवा शिल्पाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याशिवाय सुमोना चक्रवर्ती, मनीषा रानी, ​​विवेक दहिया, हेली शाह, निमृत कौर अहलूवालिया, नील भट्ट, शोएब इब्राहिम, खानजादी या सेलिब्रिटींना 'खतरों के खिलाडी १४' शोची ऑफर देण्यात आली आहे. 

Web Title: bhabhiji ghar par hai fame actress shilpa shinde to participate in khatron ke khiladi 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.