'भाभीजींचा..' चा गोव्यात दिसला ग्लॅमरस अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 09:08 AM2018-03-05T09:08:32+5:302018-03-05T14:38:32+5:30

गो..गोवा.. गॉन म्हणत  भीभीजी घर पर है मालिकेतील अंगुरी भाभी आणि अनिता भाभीचा हटके लूक रसिकांना पाहायला मिळणार आहे.अंगुरी ...

'Bhabhi ji ..' looks glamorous in Goa! | 'भाभीजींचा..' चा गोव्यात दिसला ग्लॅमरस अंदाज!

'भाभीजींचा..' चा गोव्यात दिसला ग्लॅमरस अंदाज!

googlenewsNext
..गोवा.. गॉन म्हणत  भीभीजी घर पर है मालिकेतील अंगुरी भाभी आणि अनिता भाभीचा हटके लूक रसिकांना पाहायला मिळणार आहे.अंगुरी आणि अनिता भाभी नव्या अवतारात रसिकांपुढं येतोय. दोघींचा हा नवा अंदाज पाहून सा-यांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण  दोघीही यावेळी वेस्टर्न लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. एरव्ही आपण दोघींना साडी,दागिने अशा ट्रेडिशनल लूकमध्ये पाहिले आहे.मात्र आता हा दोघींचा बदलेला लूक सा-यांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे.दोघींच्या या नव्या अवतारासाठी बराच खटाटोप केल्याचं सांगण्यात येतंय. मालिकेच्या कलाकारांनीही रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर ठेवलेली नाही. त्यामुळेच या कलाकारांचा गोव्यात शूटिंग दरम्यान असलेला उत्साह पाहून नक्कीच   वाह रे वा.....  रोलसाठी इतकी तयारी... मान गये......असे आपसुकच शब्द ओठावर आल्याशिवाय राहणार नाहीत हे मात्र नक्की.

भाभीजी घर पर है या मालिकेची कथा कानपूरची असल्याचे दाखवण्यात आले आहे. पण आता आता या मालिकेतील सगळी मंडळी गोव्याला फिरायला जाणार आहेत. अंगुरी-तिवारी,अनिता-विभुती या जोडप्यांसोबतच हप्पू, सक्सेना, टीका, मालखन आणि टिल्लू अशी सगळी गँगच गोव्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर धमाल मस्ती करताना दिसणार आहे. 'भाभीजी घर पर है'ची टीम गोव्याच्या निसर्गाचा आस्वाद घेत असताना त्यांच्या रोलर कोस्टर अनुभवांमुळे प्रेक्षकांना खळखळून हसायला मिळणार यात काहीच शंका नाही.भाभीजी घर पर है या मालिकेचे चित्रीकरण सध्या गोव्यातील सुंदर चर्चेस, किल्ले आणि समुद्रकिनाऱ्यांवर सुरू आहे. या मालिकेच्या टीमसाठी हा खूपच चांगला आणि वेगळा अनुभव आहे. याविषयी अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी शुभांगी अत्रे सांगते,"मी याआधीही मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत अनेकवेळा गोव्याला गेले आहे. पण इतकी धमाल मस्ती मी कधीच केली नव्हती. आम्ही सतत चित्रीकरण करतोय. त्याने खरे तर आम्ही प्रचंड थकतो. पण त्यातही गोव्याचा उत्साह एका नव्या पद्धतीने अुनभवत आहे. चित्रीकरणासोबत गोव्यात फिरायला देखील मिळावे म्हणून निर्मात्यांनी मालिकेचे चित्रीकरणाचे टाईमटेबल खूपच चांगल्याप्रकारे आखले होते."

Web Title: 'Bhabhi ji ..' looks glamorous in Goa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.