बेला शेंडेने गायले टायटल साँग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 15:13 IST2016-09-28T09:43:30+5:302016-09-28T15:13:30+5:30
नकुशी...तरीही हवीहवीशी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा टिजर सोशल नेटवर्किंग साईटवर प्रदर्शित झाल्यापासून या टिजरला ...

बेला शेंडेने गायले टायटल साँग
न ुशी...तरीही हवीहवीशी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा टिजर सोशल नेटवर्किंग साईटवर प्रदर्शित झाल्यापासून या टिजरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेचे टायटल साँग आजची मराठीतील आघाडीची गायिका बेला शेंडेने गायले आहे. बेलाने याआधी अनेक मालिकांच्या टायटल साँगना आपला आवाज दिला आहे. या मालिकेची कथा एका स्त्रीभोवती फिरत असल्याने या मालिकेचा भाग व्हायला अधिक आनंद होत असल्याचे बेलाचे म्हणणे आहे. बेला सांगते, "आज आपण तांत्रिकदृष्ट्या प्रचंड प्रगती केली असली तरी आजही आपण अनेक परंपरा-प्रथांना कवटाळून ठेवले आहे. या सगळ्यातून आपण बाहेर पडायला पाहिजे. महेशने संगीतबद्ध केलेले हे गाणे मला खूपच आवडले. हे गाणे रसिकांना आवडेल अशी मला आशा आहे."