n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">जाना ना दिले से दूर या मालिकेला सुरू होऊन केवळ काहीच महिने झाले आहेत. पण या मालिकेतील शिवानी सुर्वे आणि विक्रम सिंग चौहान यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या मालिकेत नुकतेच एक चुंबनदृश्य शिवानी आणि विक्रम यांच्यावर चित्रीत करण्यात आले. खरे तर सुरुवातीला या मालिकेत हे दृश्य नव्हते. पण शेवटच्या क्षणी या दोघांची केमिस्ट्री अधिक फुलवण्यासाठी चुंबनदृश्य चित्रीत करण्याचे ठरवण्यात आले. शिवानी आणि विक्रम हे दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंडस असल्याने हे दृश्य कशाप्रकारे चित्रीत करावे हे त्या दोघांनाही कळत नव्हते. अनेक रिटेकनंतर त्या दोघांनी हे दृश्य दिले. पण या दृश्याच्या चित्रीकरणानंतर ते दोघे एक दिवस एकमेकांशी काहीच बोलले नाहीत. एकमेकांशी कसे बोलायचे हेच त्यांना कळत नव्हते. त्या दोघांसाठीही चुबंनदृश्य चित्रीत करणे खूपच कठीण होते असे ते सांगतात.