सईने दिले चाहत्याला बर्थ डे सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:48 IST2016-01-16T01:10:19+5:302016-02-10T12:48:13+5:30
मालिकेतील प्रमुख सून जान्हवी, तर मालिकेच्या सुरुवातीलाच गोखल्यांच्या घरची सून झाली. त्यानंतर जान्हवीचे फ्रेंड्स मनीष आणि गीताचेही लग्न झाले. ...

सईने दिले चाहत्याला बर्थ डे सरप्राईज
म लिकेतील प्रमुख सून जान्हवी, तर मालिकेच्या सुरुवातीलाच गोखल्यांच्या घरची सून झाली. त्यानंतर जान्हवीचे फ्रेंड्स मनीष आणि गीताचेही लग्न झाले. इतकंच काय तिचा भाऊ पिंट्याचेदेखील मंगलकार्य काही दिवसांपूर्वी संपन्न झाले. अगदी मालिका संपत आली, जान्हवीची आई म्हणजेच कला, सुधारायची वेळ आली, जान्हवीला मूल व्हायची डेटही जवळ आली, पण श्रीच्या सरू मावशीचे काही लग्न जमत नव्हते. मध्यंतरी पप्पूची एंट्री घेऊन अचानक तो योग आलाही होता. इतक्याच सरू मावशींचे अत्यानंदबाबा कुठे मध्येच शिंकले माहीत नाही, पण ते लग्नाचे बारगळलेच. मात्र, आता मालिकाच संपण्याच्या निमित्ताने का होईना सर्वांनीच सरू मावशी आणि पप्पू.. सॉरी.. प्रद्युम्न यांचे लग्न जुळवून आणले आहे आणि लवकरच ते आपल्याला पाहायलाही मिळणार आहे. नशीब इतकंच की सोशल मीडियावर जान्हवीच्या लांबणीवर पडत असलेल्या डिलिव्हरी डेटवर जसे जोक्स फिरत होते तसे सरू मावशींवर आले नाहीत आणि अगदीच ते आले असते, तर अत्यानंद महाराजांनी त्यांच्या या भक्ताला त्या जोक्सपासून वाचवलेच असते.. हो की नाही? आपल्या आवडत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीच्या बर्थ डेला त्यांच्या चाहत्यांनी अनेकदा सरप्राईज दिल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण इथे चक्क एका सेलिब्रिटीने तिच्या चाहत्याच्या बर्थ डेला सरप्राईज दिलं आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून तरुणाईला वेड लावणारी अभिनेत्री सई ताम्हणकर आहे. हा चाहता सईचा इतका मोठा फॅन आहे की तो तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो. इतकेच नाही तर त्याने स्वत:च्या हातावर असा सईच्या नावाचा टॅटूदेखील काढला आहे.