लेडीज स्पेशलमध्ये 'या' भूमिकेत दिसणार बप्पी लहिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 17:07 IST2019-02-14T16:56:42+5:302019-02-14T17:07:04+5:30
बॉलिवूडचे ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहिरी लवकरच छोट्या पडद्यावर झळकताना दिसणार आहेत.

लेडीज स्पेशलमध्ये 'या' भूमिकेत दिसणार बप्पी लहिरी
बॉलिवूडचे ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहिरी लवकरच छोट्या पडद्यावर झळकताना दिसणार आहेत. ते सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील लेडीज स्पेशल कार्यक्रमात पाहुणे कलाकार म्हणून काम करणार आहेत.
छवी पांडे साकारत असलेली प्रार्थना कश्यप ही ह्या मालिकेत एक उगवती गायिका म्हणून दर्शवण्यात आली आहे. तिच्या गाण्याच्या कौशल्याने तिच्या ऑफिसमधील लोकांबरोबरच सगळ्यांना भुरळ घातली आहे. पुढे दाखवण्यात येणाऱ्या भागांत बप्पी लहिरी नव्या म्युझिक अल्बमसाठी अशा आवाजांच्या शोधात आहेत ज्यांना इंडस्ट्रीमध्ये अजूनही संधी मिळाली नाही असं सादर करण्यात येणार आहे. असा शोध घेताना बप्पीदांना प्रार्थनाचा व्हायरल झालेला एक ऑनलाईन अल्बम दिसतो. ते प्रार्थनाला तिच्याबरोबर गाणं रेकॉर्ड करण्याची ऑफर देतात. ही संधी प्रार्थनाचं आयुष्य बदलावणारी ठरेल का?
बप्पीदा म्हणतात, "मी ह्या कार्यक्रमाचा एक भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहे. लोकांच्या रोजच्या आयुष्यातील समस्यांना दाखवणारी ही मालिका म्हणजे आयुष्याचाच एक भाग आहे. ह्या इंडस्ट्रीमध्ये एवढा मोठा काळ काढल्यामुळे मी ह्या गोष्टींशी स्वतःशी रिलेट करू शकतो. मी छवीला स्वतः गाताना ऐकलं आणि बघितलं आहे आणि मला असं वाटतं की ती चांगलं गाते आणि सर्वांवर तिच्या आवाजाच्या जादूचा प्रभाव पडेल. जेव्हा मला ह्या रोलबद्दल विचारण्यात आलं तेव्हा मी एक क्षणही न लावता हो म्हणलं."