'बाई तुझा आशीर्वाद' मालिकेत दिसणार नवा चेहरा, नवोदित अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:34 IST2026-03-31T15:31:49+5:302026-03-31T15:34:17+5:30

घराला घरपण देणाऱ्या अवनीची भूमिका साकारणार आहे नवोदित अभिनेत्री अक्षता अनिता प्रमोद.

bai tuza ashirwad actress akshata pramod to play lead role in star pravah serial | 'बाई तुझा आशीर्वाद' मालिकेत दिसणार नवा चेहरा, नवोदित अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

'बाई तुझा आशीर्वाद' मालिकेत दिसणार नवा चेहरा, नवोदित अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होतेय नवी मालिका 'बाई तुझा आशीर्वाद'. घराला घरपण देणारी स्त्री म्हणजेच ‘बाई’ या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या घराला बाईच्या असण्याचीच सवय नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं… आणि तिथूनच सुरू होतो नात्यांचा नवा प्रवास. तिच्या येण्याने त्या घरात फक्त एक व्यक्ती नाही, तर समज, संवाद, आपुलकी आणि घरपण येतं. घराला घरपण देणाऱ्या अवनीची भूमिका साकारणार आहे नवोदित अभिनेत्री अक्षता अनिता प्रमोद.

रुईया कॉलेजमधून फिलॉसॉफी विषयात ड्रिग्री घेतलेल्या अक्षताला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्र खुणावत होतं. ७ वर्षांची असतानाच तिने कथ्थक शिकायला सुरुवात केली. अक्षताच्या नृत्यकलेतूनच तिला तिच्या आयुष्यातली ‘स्टार’ ही पहिली एकांकिका मिळाली. ही एकांकिका खूप गाजली. त्यानंतर 'गुड बाय किस', 'अत्तरमन' अश्या अनेक एकांकिका अवनीने केल्या. याच दरम्यान तिला 'बाई तुझा आशीर्वाद' या मालिकेतल्या अवनी या मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी विचारणा झाली. अवनी दिसायला सुंदर.. बोलायला लाघवी.. मीतभाषी. घरात आई-बाबांची लाडकी असली तरी तिला आई वडिलांच्या प्रेमळ शब्दांपुढे आपला हट्ट रेटता येत नाही. अवनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग कसा करणार याची गोष्ट मालिकेतून उलगडेल. 

अवनी या भूमिकेप्रमाणेच अक्षता देखिल खूप महत्त्वाकांक्षी आहे. खऱ्या आयुष्यातही अभ्यासात प्रचंड हुशार आणि सतत नवं काहीतरी करण्याची धडपड यामुळेच अवनी हे पात्र खूप भावल्याचं अक्षता म्हणते. त्यामुळेच ही मालिका केवळ एक अभिनयाची संधी नसून स्वत:ला व्यक्त करायची संधी असल्याची भावना अवनीने व्यक्त केली. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका बाई तुझा आशीर्वाद लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.

Web Title : 'बाई तुझा आशीर्वाद' में नया चेहरा, अभिनेत्री निभाएंगी मुख्य भूमिका

Web Summary : स्टार प्रवाह के 'बाई तुझा आशीर्वाद' में अक्षता अनिता प्रमोद अवनी के रूप में डेब्यू कर रही हैं। कहानी अवनी के एक पुरुष-प्रधान घर में आने के इर्द-गिर्द घूमती है, जो समझ और गर्मजोशी लाती है। अक्षता दर्शनशास्त्र स्नातक हैं और कथक नृत्यांगना भी हैं।

Web Title : New Face in 'Bai Tuza Ashirwad', Actress to Play Lead

Web Summary : Akshata Anita Pramod debuts as Avani in Star Pravah's 'Bai Tuza Ashirwad'. The story revolves around Avani's arrival in a male-dominated household, bringing understanding and warmth. Akshata, a philosophy graduate, is also a trained Kathak dancer and has acted in plays.