ओळखा पाहू कोण आहे हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता? त्याला ओळखणे देखील जातंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 18:17 IST2019-07-08T18:12:13+5:302019-07-08T18:17:01+5:30
हा छोटा पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने मालिकांसोबत अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

ओळखा पाहू कोण आहे हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता? त्याला ओळखणे देखील जातंय कठीण
राम कपूरने 'घर एक मंदिर', 'कसम से', 'बडे अच्छे लगते है' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण कसम से मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. काही वर्षांपूर्वी कसम से या मालिकेत तो प्राची देसाईसोबत झळकला होता. त्यानंतर 'बडे अच्छे लगते है' या मालिकेने त्याच्या करियरला एक वेगळीच दिशा दिली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
बडे अच्छे लगते है या मालिकेतील त्याच्या आणि साक्षी तन्वरच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. तसेच या मालिकेतील एक इंटिमेट सीन देखील गाजला होता. आज राम हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता असून त्याने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याला त्याच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
राम नुकताच करले तू भी मोहोब्बत या बेवसिरिजमध्ये झळकला होता. तसेच लव्हयात्री या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटात देखील त्याची महत्त्वाची भूमिका होती. राम कपूरच्या अभिनयासोबतच त्याच्या वजनाची देखील नेहमीच चर्चा होते. रामचे वजन जवळजवळ 96 किलो होते. पण त्याने आता कित्येक किलो वजन कमी केले असून आपल्याला एक वेगळाच राम पाहायला मिळत आहे. रामने नुकतेच सोशल मीडियावर त्याचे काही फोटो पोस्ट केले असून या फोटोंमध्ये रामला ओळखणे देखील कठीण जात आहेत.
राम कपूरचे इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिले तर सध्या तो त्याच्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेत असल्याचे आपल्याला लक्षात येत आहे. त्याची पत्नी गौतमी कपूर ही खूप फिट असून तिनेच त्याला फिट व्हायला प्रेरित केले असल्याचे म्हटले जात आहे. रामने नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोवर त्याचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत असून त्याचा हा नवा लूक त्याच्या चाहत्यांना आवडत आहे. एवढेच नव्हे तर रामने मिशी वाढवली असून या लूकमध्ये तुम्हाला ओळखणेच कठीण जात असल्याचे त्याचे चाहते प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगत आहेत.