वो...अपना सा फेम दिशा परमारच्या आयुष्यात घडली ही वाईट घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 15:37 IST2017-06-21T10:07:21+5:302017-06-21T15:37:21+5:30
दिशा परमार वो...अपना सा या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. दिशाच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दिशाच्या आयुष्यातील ...
.jpg)
वो...अपना सा फेम दिशा परमारच्या आयुष्यात घडली ही वाईट घटना
द शा परमार वो...अपना सा या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. दिशाच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दिशाच्या आयुष्यातील एक अतिशय वाईट घटना नुकतीच घडली आहे. तिच्या वडिलांचे नुकतेच दीर्घ आजारामुळे निधन झाले. आपल्या आयुष्यातील या मोठ्या धक्क्यामुळे दिशा खूपच दुःखी झाली होती. पण तरीही तिने आपली जबाबदारी ओळखून चारच दिवसांत पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली. तिचे वडील गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीत राहात असत. तिथेच त्यांचे निधन झाले. आता दिशा मुंबईत पुन्हा आली आहे. याविषयी ती सांगते, आपल्या वडिलांचे निधन यापेक्षा कदाचित मोठे नुकसान आणखी काहीच असू शकत नाही. पण माझ्या घरचे आणि मी आज हे मानतो की, ते आता आणखी चांगल्या जागी आहेत आणि त्यांना वेदनांचा सामना करावा लागणार नाही. ते माझे जग होते आणि ते आम्हाला सोडून गेल्यावर चार दिवसांत मी कामावर रूजू होणे हे त्यांचेच तत्त्व आहे. त्यांनी आम्हाला नेहमीच आपल्या जबाबदाऱ्यांना सर्वोच्च स्थान द्यायला शिकवले. आपल्या भावना किंवा समस्यांना अधिक महत्त्व देण्याआधी आपल्या कर्तव्याकडे आपण लक्ष द्यायला हवे असे त्यांनी आम्हाला शिकवले आणि ते खरे आहे. त्यामुळे मला मदतच झाली आहे. दिशाचा या मालिकेतील सहकलाकार सुदीप साहिर म्हणाला, आमच्या प्रार्थना दिशाच्या वडिलांसोबत आहेत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. दिशाचे प्रोफेशनलिझम आणि परिपक्कवता यामुळेच इतक्या मोठ्या धक्क्यानंतरही ती सेटवर परत येऊ शकली आहे. अन्य कोणी असते तर त्यांना वेळ लागला असता. पण दिशाला ठाऊक आहे की तिच्याशिवाय प्रोडक्शन टीमसाठी सगळं सांभाळणे किती कठीण झाले असते. त्यामुळे तिने मालिकेला प्राधान्य दिले. त्यासाठी तिला सलाम.