"मागे एका भांडणात ही म्हणाली होती, सगळ्या...", कुशल बद्रिकेची पत्नीसाठी केलेली ती पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 15:32 IST2024-04-27T15:31:40+5:302024-04-27T15:32:22+5:30
Kushal Badrike : आता कुशलच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यात त्याने पत्नी सुनयनाचा उल्लेख केला आहे.

"मागे एका भांडणात ही म्हणाली होती, सगळ्या...", कुशल बद्रिकेची पत्नीसाठी केलेली ती पोस्ट चर्चेत
'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमातून अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) प्रसिद्धीझोतात आला. विनोदाचे अचूक टायमिंग साधत त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सध्या तो सोनी टिव्हीवरील 'मॅडनेस मचाऐंगे' या हिंदी कार्यक्रमात झळकत आहे. दरम्यान आता कुशलच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यात त्याने पत्नी सुनयनाचा उल्लेख केला आहे.
कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कुशलच्या हातात खूप सामानाच्या बॅगा दिसत आहेत. तसेच या फोटोत त्याची पत्नी सुनयना दिसते आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, मागे एका भांडणात ही म्हणाली होती, सगळ्या संसाराचा भार हिने एकटीनेच उचललाय म्हणून. कुशलच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. त्याच्या या पोस्टवर तेजस्विनी पंडीत, नम्रता संभेराव यांनी हसणारी स्माइली शेअर केली आहे.
कुशलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तो 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय शोमध्ये काम करत होता. पण सध्या या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. कुशल सध्या हेमांगी कवीसोबत 'मॅडनेस मचाएंंगे' या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहे. तर त्याची पत्नी सुनयना ही उत्तम कथक डान्सर आहे. काही दिवसांपूर्वी ती ‘मुघल-ए-आझम’ या म्युझिकल शोसाठी अमेरिकेला गेली होती. दिग्दर्शक फिरोज अब्बास खान यांनी मुघल-ए-आझम या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.