बॅक इन अॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 16:44 IST2016-09-01T11:14:04+5:302016-09-01T16:44:04+5:30
नागार्जुन - एक योद्धा या मालिकेतून सुदीपा सिंग गेली कित्येक दिवसांपासून गायब आहे. सुदीपाला दुखापत झाल्याने ती काही दिवस ...
.jpg)
बॅक इन अॅक्शन
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">नागार्जुन - एक योद्धा या मालिकेतून सुदीपा सिंग गेली कित्येक दिवसांपासून गायब आहे. सुदीपाला दुखापत झाल्याने ती काही दिवस मालिकेचे चित्रीकरण करत नव्हती. ती काही दिवसांपूर्वी तोंडावर आपटली होती. तिच्या चेहऱ्याला काही टाकेदेखील पडले होते. त्यामुळे चित्रीकरण करणे तिच्यासाठी अशक्य झाले होते. पण आता तिची तब्येत पूर्णपणे चांगली झाली असून तिने मालिकेच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात केली आहे. याबद्दल सुदीपा सांगते, "कोणत्याही कलाकारासाठी त्याचा चेहरा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यामुळे मी तोंडावर पडल्यानंतर खूपच घाबरली होती. पण आता माझी जखम पूर्णपणे बरी झाली आहे. मी यामुळे 15 दिवस चित्रीकरण करू शकली नव्हते. मी चित्रीकरण, माझे सहकलाकार यांना सगळ्यांना खूप मिस केले."