जयंत-जान्हवीच्या आयुष्यात बबुचकाची एन्ट्री, मेघन जाधव म्हणाला - "त्याला लहानाबाळासारखं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 15:17 IST2025-07-08T15:17:05+5:302025-07-08T15:17:27+5:30

Lakshmi Niwas Serial : 'लक्ष्मी निवास' मालिकेत ज्या नवीन पाहुण्याची चर्चा सर्वत्र होती तो दुसरा कोणी नसून एक ससा आहे. ज्याची एन्ट्री सिद्धू-भावनांच्या लग्नाच्या दरम्यान झाली होती.

Babuchka's entry into Jayant-Janhvi's life in Lakshmi Niwas Serial, Meghan Jadhav said - ''He is like a little child...'' | जयंत-जान्हवीच्या आयुष्यात बबुचकाची एन्ट्री, मेघन जाधव म्हणाला - "त्याला लहानाबाळासारखं..."

जयंत-जान्हवीच्या आयुष्यात बबुचकाची एन्ट्री, मेघन जाधव म्हणाला - "त्याला लहानाबाळासारखं..."

'लक्ष्मी निवास' (Lakshmi Niwas Serial) मालिकेत ज्या नवीन पाहुण्याची चर्चा सर्वत्र होती तो दुसरा कोणी नसून एक ससा आहे. ज्याची एन्ट्री सिद्धू-भावनांच्या लग्नाच्या दरम्यान झाली होती. जेव्हा जयंत- जान्हवी आंनदीला वाचवायला गेले होते तिथे जान्हवीला हा छोटासा ससा दिसतो आणि तिला तो प्रचंड आवडतो आणि तिला सरप्राईज देण्यासाठी जयंत सश्याला घरी घेऊन येतो. त्याला पाहून जान्हवी खूप खुश होते, ती त्याचे नाव बबुचका ठेवते. सेटवर कोणी नवीन शूट करायला आलं की माहोल बदलून जातो आणि तसंच काहीसं झालं 'लक्ष्मी निवास'च्या सेटवर. 

मेघन जाधव म्हणजेच जयंतने सश्यासोबतचा आपला अनुभव व्यक्त करताना सांगितले की, "माझ्या अभिनयाच्या प्रवासात मी पहिल्यांदाच एक प्राण्यासोबत शूट करत आहे. माझ्यासाठी हा नवीन अनुभव आहे. सश्यासोबत आमचे बरेच सीन सध्या होत आहेत. शूट करताना मज्जा येत आहे, तो इतका गोड आहे आणि तो नाही ती आहे. फिमेल ससा आहे. ती लहान आहे ती आमच्यासोबत काम करते, खेळते. जितकं तुम्हाला मालिकेत बघताना मज्जा येत आहे. तितकाच आम्हाला शूट करताना येत आहे. हॅट्स ऑफ झी मराठी टीमला त्यांनी सर्व गोष्टींची काळजी घेऊन त्याला मालिकेत आणले आहे. एका लहान बाळासारखी आम्ही त्याची काळजी घेतो, कारण शूटिंग म्हटलं की अनेक उपकरणे सेटवर असतात तर त्या कुठे काही लागू नये याची अत्यंत काळजी घेतली जाते." 



तर दिव्या पुगावकर म्हणजेच जान्हवी म्हणाली, ''सश्यासोबत काम करणं जितकं मजेशीर आहे तितकेच कठीणही आहे. कारण त्याला त्याच्या वेळेवर खावं लागतं आणि त्याला सारखं उचलून घेतलेलं आवडत नाही. त्याला बागडायचं असतं. मी त्याची काळजी घेत सर्व नवीन गोष्टी अनुभवत आहे.''  

Web Title: Babuchka's entry into Jayant-Janhvi's life in Lakshmi Niwas Serial, Meghan Jadhav said - ''He is like a little child...''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.