बाबाने केले १०० महिलांचे लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 18:35 IST2016-05-24T13:05:56+5:302016-05-24T18:35:56+5:30

अपत्‍यप्राप्‍ती व्‍हावी यासाठी येणा-या महिलांशी अश्‍लील चाळे करणा-या एका भोंदू बाबाच्‍या पोलिसांनी मुसक्‍या आवळल्‍या आहेत. उत्‍तर प्रदेशातील बाराबंकी येथील ...

Baba has done 100 sexual abuse of women | बाबाने केले १०० महिलांचे लैंगिक शोषण

बाबाने केले १०० महिलांचे लैंगिक शोषण

त्‍यप्राप्‍ती व्‍हावी यासाठी येणा-या महिलांशी अश्‍लील चाळे करणा-या एका भोंदू बाबाच्‍या पोलिसांनी मुसक्‍या आवळल्‍या आहेत. उत्‍तर प्रदेशातील बाराबंकी येथील हा स्‍वयंघोषित भोंदू बाबा असून याचे कारमाने पाहून तुम्‍ही थक्‍क व्‍हाल. राम शंकर तिवारी उर्फ परमानन्द असे या भोंदूचे नाव असून तो महिलांवर बलात्‍कार करायचा अशी माहितीही समोर आली आहे.

पोलिसांच्‍या चौकशीत धक्‍कादायक बाबी उघड..
- पोलिसांनी सांगितले, या बाबाविरोधात एकूण आठ व्‍हिडियो समोर आले आहेत.
- शिवाय या भोंदू बाबावर 12 खटलेही दाखल आहेत.
- पोलिसांनी सांगितले, सीसीटीव्‍हीव्‍दारे हा बाबा महिलांवर लक्ष ठेवायचा.
- त्‍यानंतर जी महिला त्‍याला पसंत येत होती. तिला जाळ्यात ओढून तो अश्‍लील चाळे करायचा.

अश्‍लील क्‍लिपही होत शुट..
लोकांच्‍या डोळ्यात धुळफेक करुन अश्‍लील चाळे करणा-या या भोंदू बाबाचे पराक्रम ऐकुन कोणालाही संताप येईल. महिलांशी अश्‍लील चाळे करताना हा बाबा त्‍यांचे चोरुन व्‍हिडियो तयार करायचा व महिलांना ब्लॅकमेल करण्‍यासाठी या व्‍हिडियोचा वापर करायचा. आणखी या भोंदूविरोधात तक्रारी येत असल्‍याचे पोलिसांनी सांगितले

Web Title: Baba has done 100 sexual abuse of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.