'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये आयेशा झुल्का यांची वाइल्ड कार्ड एंट्री, किचनमध्ये लावणार तडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:57 IST2025-02-07T16:41:38+5:302025-02-07T16:57:35+5:30

Celebrity MasterChef Show :'सेलिब्रिटी मास्टरशेफ' सध्या चर्चेत आहे. प्रसिद्ध टीव्ही कलाकार त्यांच्या स्वयंपाक कौशल्याने तीन परिक्षकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच शोमध्ये ट्विस्ट येणार आहे.

Ayesha Jhulka's wild card entry in 'Celebrity MasterChef', will create a stir in the kitchen | 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये आयेशा झुल्का यांची वाइल्ड कार्ड एंट्री, किचनमध्ये लावणार तडका

'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये आयेशा झुल्का यांची वाइल्ड कार्ड एंट्री, किचनमध्ये लावणार तडका

'सेलिब्रिटी मास्टरशेफ' (Celebrity MasterChef Show) सध्या चर्चेत आहे. प्रसिद्ध टीव्ही कलाकार त्यांच्या स्वयंपाक कौशल्याने तीन परिक्षकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच शोमध्ये ट्विस्ट येणार आहे. आता या शोमध्ये पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक दाखल होणार आहे. आमिर खानची सहकलाकार अभिनेत्री हातात लाडू घेऊन स्वयंपाकघरात तडका लावताना दिसणार आहे. या शोला फराह खान, विकास खन्ना आणि रणवीर ब्रार जज करत आहेत. अभिनेत्री आयेशा झुल्का (Ayesha Jhulka) वाइल्ड कार्ड एंट्रीने थेट या किचनमध्ये दाखल होणार आहेl.

आयेशा झुल्का हे बॉलिवूडमधील एक लोकप्रिय नाव आहे. 'जो जीता वो ही सिकंदर' आणि 'खिलाडी'सारख्या गाजलेल्या चित्रपटात त्यांचा अभिनय प्रेक्षकांनी पाहिलेला आहे. खूप मोठ्या विश्रांतीनंतर आयेशा पुन्हा टेलिव्हिजनवर परतत आहेत. पण यावेळी, एक अभिनेत्री म्हणून नाही, तर सेलिब्रिटी मास्टरशेफमधली एक स्पर्धक बनून! आपला आनंद व्यक्त करताना आयेशा झुल्का म्हणाल्या की, “लहानपणापासून माझा कुकिंगशी संबंध आला आहे आणि वेगेवेगळ्या फ्लेवर्ससह प्रयोग करायला मला आवडते. सेलिब्रिटी मास्टरशेफ मध्ये येणे हे माझ्यासाठी अगदी नव्या स्वरूपाचे आव्हान आहे. आपल्या मान्यवर परीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, बुद्धिमान सह-स्पर्धकांच्या तुलनेत माझ्या कौशल्याची तपासणी करण्यासाठी मी उत्सुक आहे. हा माझ्या कारकीर्दीतील एक नवीनच अध्याय आहे. तो कसा उलगडतो हे बघण्यास मी उत्सुक आहे.

आयेशा झुल्का झळकल्यात या सिनेमात
आयेशाने याआधी अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे. आमिर खानच्या 'जो जीता वही सिकंदर' या चित्रपटातून त्या चर्चेत आल्या होत्या. यानंतर त्यांनी 'खिलाडी', 'सोचा ना था' आणि 'उमराव जान' सारखे अनेक उत्तम चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्या शेवटच्या २०२२ मध्ये 'हुश हुश' आणि २०२३ मध्ये OTT वर 'हॅपी फॅमिली: कंडीशन्स अप्लाय' मध्ये दिसल्या होत्या. आता यानंतर चाहत्यांना त्यांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.
 

Web Title: Ayesha Jhulka's wild card entry in 'Celebrity MasterChef', will create a stir in the kitchen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.