'नवा गडी नवं राज्य'फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने घरात केली चोरी; 'या' गोष्टीमुळे चोरावे लागले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 17:42 IST2023-05-08T17:42:00+5:302023-05-08T17:42:22+5:30

Pallavi Patil: 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत अभिनेत्री पल्लवी पाटीलने केली होती चोरी

Awkward Rapid Fire With marathi actress Pallavi Patil | 'नवा गडी नवं राज्य'फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने घरात केली चोरी; 'या' गोष्टीमुळे चोरावे लागले पैसे

'नवा गडी नवं राज्य'फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने घरात केली चोरी; 'या' गोष्टीमुळे चोरावे लागले पैसे

काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावर 'नवा गडी नवं राज्य' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे उत्तम कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असतो. सध्या या मालिकेतील एक अभिनेत्री चर्चेत आली आहे. एकेकाळी या अभिनेत्रीने चक्क तिच्याच घरी चोरी केली होती. याविषयी तिने स्वत: लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील मुख्य भूमिका साकारत आहे. तिने साकारलेली आनंदी विशेष लोकप्रिय ठरत असून ती सोशल मीडियावर कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असते. यात अलिकडेच तिने तिच्या घरी चोरी केल्याचं सांगितलं. पल्लवीने लहान असताना चोरी केली होती. मात्र, तिची ही चोरी आईने पकडली होती. विशेष म्हणजे चोरी पकडल्यानंतर आपली चोरी कशी योग्य आहे हे तिने आईला सांगितलं. पण, त्यानंतर तिला चांगलाच मार मिळाला होता.

'आईने डब्ब्यात ठेवलेले पैसे कधी न विचारता घेतले आहे का?' , असा प्रश्न पल्लवीला विचारण्यात आला होता. त्यावर तिने हो असं उत्तर देत घडलेला प्रकार सांगितला.

"हो मला खूप वाईट सवय लागली होती. आमच्याकडे अक्षयतृतीयेला पैशांवर पत्ते खेळतात. माझे काका वगैरे खेळायचे. हा एकच दिवसाचा खेळ असतो. त्यामुळे मज्जा म्हणून आम्ही पण खेळायचो. त्यावेळी मी पैसे चोरायचे. म्हणजे आमच्याकडे दुपारी सगळे जण जेवण वगैरे करुन झोपतात. त्यावेळी  मी माझ्या सगळ्या बहिणींना गोळा करुन पैसे चोरायला जायचे. आणि एकदा मी पकडले गेले, त्यानंतर तूच आहेस का ती पैसे चोरणारी असं आईने विचारलं. त्यावर, मी काय झालं मग मी २ रुपये चोरते पण ५ रुपये घेऊन येते. म्हणजे मी ३ रुपये जिंकते असं सांगितलं. पण त्यानंतर मी खूप मार खाल्ला होता,"असं उत्तर तिने दिलं.

दरम्यान, पल्लवीला ऑक्वर्ड रॅपिड फायर राऊंडमध्ये हा प्रश्न विचारला होता. ज्याचं तिने खरं खरं उत्तर दिलं. या प्रश्नासोबतच तिने अनेक भन्नाट प्रश्नांची हटके उत्तरं दिली.

Web Title: Awkward Rapid Fire With marathi actress Pallavi Patil