व्हिएतनाममध्ये अविनाश नारकर यांचं अॅडव्हेंचर, पायाने बोट चालवली अन्...; पाहा मजेशीर व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 15:29 IST2025-05-22T15:29:22+5:302025-05-22T15:29:45+5:30
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल. सध्या ते दोघेही व्हिएतनाममध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहेत.

व्हिएतनाममध्ये अविनाश नारकर यांचं अॅडव्हेंचर, पायाने बोट चालवली अन्...; पाहा मजेशीर व्हिडिओ
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल. सध्या ते दोघेही व्हिएतनाममध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. तिथेदेखील ते ट्रेंडिंग गाण्यांवर रील बनवत आहेत. तर व्हिएतनाममधील मज्जा मस्ती ते फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. नारकर कपल व्हिएतनाममधील अपडेट्स चाहत्यांना देत आहेत.
नुकतंच अविनाश नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये व्हिएतनाममध्ये ते बोट सफारी करताना दिसत आहेत. या व्हिडिओत एक माणूस पायाने बोट चालवताना दिसत आहे. अविनाश नारकरही त्या व्यक्तीसारखी पायाने बोट चालवण्यासाठी ट्राय करत असल्याचं दिसत आहे. "Adventure नवरा, घाबरलेली बायको..." असं म्हणत त्यांनी हा रील शेअर केला आहे. तर "जे वाटेल ते करून घ्यावं", असं कॅप्शन त्यांनी व्हिडिओला दिलं आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
ऐश्वर्या आणि अविनाश व्हिएतनाममध्ये धमाल मस्ती करत आहे. व्हिएतनाम ट्रिपचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी शेअर केले आहेत. परदेशातही रील बनवण्याचा मोह त्यांना आवरता आलेला नाही. रील्समधून आणि फोटोमधून व्हिएतनामच्या सौंदर्याची झलक त्यांनी चाहत्यांना दाखवली आहे.