Video: कॅमेरासमोरच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला झाल्या कोरड्या उलट्या, प्रेग्नंट असल्याच्या चर्चा; काही महिन्यांपूर्वीच झालंय लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 11:33 IST2026-03-05T11:32:46+5:302026-03-05T11:33:15+5:30
व्हिडीओत पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना अभिनेत्रीची तब्येत अचानक बिघडल्याचं दिसत आहे. त्यानंतर तिला उलट्याही होत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमुळे अभिनेत्री गरोदर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Video: कॅमेरासमोरच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला झाल्या कोरड्या उलट्या, प्रेग्नंट असल्याच्या चर्चा; काही महिन्यांपूर्वीच झालंय लग्न
सेलिब्रिटींचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका अभिनेत्रीचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओत पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना अभिनेत्रीची तब्येत अचानक बिघडल्याचं दिसत आहे. त्यानंतर तिला उलट्याही होत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमुळे अभिनेत्री गरोदर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. व्हिडीओत दिसणारी ही अभिनेत्री म्हणजे बालिका वधू फेम अविका गौर आहे.
अविका गौरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अविका तिच्या पतीसोबत दिसत आहे. कुठल्या तरी इव्हेंट दरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. अविका तिच्या पतीसोबत पापाराझींना फोटो देण्यासाठी उभी राहते. तेवढ्यात तिच्या पोटात दुखू लागतं. आणि बाजूला जाऊन ती उलट्या करत असल्याचं दिसत आहे. तर तिचा पती मिलिंद अविकाला सांभाळताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे अविका गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Balika Vadhu fame Avika Gor Vomiting in front pap, is she pregnant? pic.twitter.com/SGal7d8uqX
— Aditya (@Warlock_Aditya) March 4, 2026
अविका आणि मिलिंद यांनी ३० सप्टेंबर २०२५ रोजी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. टीव्हीवरच त्यांनी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. लग्नानंतर आता अवघ्या काही महिन्यांतच ते आईबाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.