काय सांगता! करिना कपूरच्या वर्गात होता अवधूत गुप्ते, म्हणाला, 'त्यावेळी ती फारच...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 10:21 AM2023-06-30T10:21:16+5:302023-06-30T10:22:15+5:30

घारे डोळे, चेहऱ्यावर कपूर्स ग्लो, पण एका बाकावर....

avadhoot gupte and kareena kapoor used to sit in same exam hall says she was so fat that time | काय सांगता! करिना कपूरच्या वर्गात होता अवधूत गुप्ते, म्हणाला, 'त्यावेळी ती फारच...'

काय सांगता! करिना कपूरच्या वर्गात होता अवधूत गुप्ते, म्हणाला, 'त्यावेळी ती फारच...'

googlenewsNext

शाळेच्या आठवणीत प्रत्येक जण रमतो. ती शाळेची इमारत, मैदान, बेंच अशा बऱ्याच आठवणी ताज्या होतात. शाळेत आपल्या आजूबाजूला कोण बसायचं, परिक्षेला आपल्या बाजूला कोण यायचं हेही आपल्या लक्षात असतं. अशीच शाळेची एक आठवण मराठी गायक अवधूत गुप्तेने (Avadhoot Gupte) शेअर केली आहे. शाळेत असताना परिक्षेला अवधूतच्या बाजूच्या बेंचवर चक्क करिना कपूर (Kareena Kapoor) बसायची असं त्याने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलंय. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना? नक्की काय म्हणाला अवधूत बघा. 

'मराठी किडा' या युट्यूब चॅनलला अवधूत गुप्तेने नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्याने अनेक प्रश्नांची धमाल उत्तरं दिली. आम्ही असं ऐकलं की सैफ अली खानची पत्नी, तैमुरची आई करिना कपूर खानशी कधीकाळी तुझा संबंध आला होता? यावर अवधूत हात जोडून म्हणतो, 'संबंध काय संबंध नाही रे बाबा! माझ्या वर्गात ती परिक्षेला बसायची एवढाच काय तो संबंध. काय होणार माझं सगळ्या पेपरला नापास व्हायचो आम्ही. त्यावेळेला ती लयी ढोबळी होती. एका बाकावर जेमतेम मावायची बाजूच्याला जागाच नाही मिळायची. पण चेहरा, घारे डोळे आणि तो ग्लो असा कपूर परिवाराचा असतो तसा होता. अशी मोठ्या गाडीतून उतरायची सगळे पाहतच राहायचे. त्यावेळी नाही काही बोललो पण नंतर एक दोन पार्ट्यांमध्ये बोलणं झालं.'

 करिना कपूर आणि अवधूत गुप्तेचा असा संबंधा आला असेल याचा कोणी विचारही केला नव्हता. अवधूतची ही मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. सध्या अवधूतचा 'खुपते तिथे गुप्ते' हा कार्यक्रम पुन्हा भेटीस आलाय. यावेळी अनेक राजकीय मंडळींनी कार्यक्रमात हजेरी लावल्याने प्रेक्षक काहीसे नाराज झालेत. 

Web Title: avadhoot gupte and kareena kapoor used to sit in same exam hall says she was so fat that time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.