डान्स प्लसच्या सेटवर घेतली गेली ऑडिशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 12:30 IST2016-07-20T07:00:18+5:302016-07-20T12:30:18+5:30
डान्स प्लस या कार्यक्रमात नुकतीच ढिश्शूम या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरूण धवन, जॅकलिन फर्नांडिस यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे ...

डान्स प्लसच्या सेटवर घेतली गेली ऑडिशन
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">डान्स प्लस या कार्यक्रमात नुकतीच ढिश्शूम या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरूण धवन, जॅकलिन फर्नांडिस यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे वरूणने डान्स प्लसचा सुपर जज रेमो डिसोझाने दिग्दर्शित केलेल्या एबीसीडी 2 या चित्रपटात काम केले होते. तर जॅकलिन फ्लाईंग जट या चित्रपटात रेमोसोबत काम करत आहे. यामुळे डान्स प्लसच्या या भागाचे चित्रीकरण म्हणजे एखादे गेटटुगेदर असल्यासारखेच रेमोला वाटत होते. रेमो एबीसीडी 3 या चित्रपटाचे लवकरच दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात काम करण्याची संधी मिळावी यासाठी वरुणने चक्क डान्स प्लसच्या सेटवरच ऑडिशन दिले. या त्याच्या ऑडिशनमुळे स्पर्धकांसोबतच मेन्टरही खळखळून हसले.